India-Pakistan War : जिहाद करणे हे पाकिस्तानी सैन्याचे कामच आहे; अहमद शरीफ यांचा व्हिडिओ व्हायरल

India-Pakistan War : पाकिस्तानी सैन्य एक इस्लामिक सैन्य आहे, असे शरीफ यांनी म्हटले आहे.

92

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर (Operation sindoor) अंतर्गत तीव्र कारवाई केली. त्यानंतरही पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय सैन्याने पाकचे सर्व हल्ले हाणून पाडले. सध्या दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे. असे असले, तरी पाकिस्तानचे इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (डीजी आयएसपीआर) चे महासंचालक (डीजी आयएसपीआर) अहमद शरीफ (Ahmed Sharif) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (India-Pakistan War)

पाकिस्तानी सैन्य एक इस्लामिक सैन्य आहे. तसेच, जिहाद (Jihad) करणे हे त्यांचे काम आहे, असे एका पत्रकार परिषदेदरम्यान अहमद शरीफ यांनी म्हटले आहे. हा व्हिडिओ पाकिस्तान अनटोल्ड नावाच्या एक्स अकाउंटवर पोस्ट केला आहे. अहमद शरीफ यांच्यानंतर त्या पत्रकाराने उर्दूमध्ये काही ओळीही बोलल्या आहेत.

पाकिस्तानचे डीजी आयएसपीआर अहमद शरीफ यांनी अशी चिथावणीखोर विधाने करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी दावा केला होता की, अहमद शरीफ यांचे वडील सुलतान बशिरुद्दीन महमूद यांचे दहशतवाद्यांशी संबंध होते. सुलतान बशीरुद्दीन महमूद यांचे नाव एकेकाळी पाकिस्तानच्या वैज्ञानिक समुदायात प्रतिष्ठेने घेतले जात असे. पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. धर्मांधतेमुळे त्यांनी सातत्याने भारतद्वेषी विधाने केली आहेत. (India-Pakistan War)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.