India Pak War : भारताने पाकिस्तानला सर्व बाजूंनी घेरण्याची रणनिती आखली आहे. पाकिस्तानने गुरुवारी जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात सीमेवरुन भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचा हा हवाई हल्ला भारताने यशस्वीरित्या परतवून लावला. पाकिस्तानच्या या नापाक कृतीला भारताने जशास तसं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान पाकड्यांच्या या गैरकृत्यांमुळे भारतीय लष्करी दलातील दोन जवान हुतात्मा झाले आहेत. यामधील एक जवान महाराष्ट्र मुंबई येथील असून, दूसरा जवान हा आंध्र प्रदेश येथील आहे. (India Pak War)
(हेही वाचा – Rohit Sharma Retires : रोहित शर्माचा वारसदार कोण? माजी कसोटीपटूने सुचवलं ‘हे’ नाव)
मिळालेल्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झाले असून, भारतीय सैन्य दलानेही या गोळीबाराला चोख प्रत्त्युत्तर दिले आहे. तसेच पाकिस्तानला चांगला दणका दिला आहे. तसेच पाकिस्तानच्या (Pakistan) कपटी कारवायांना उधळून लावताना भारतीय सैन्य दलाचे 2 जवान हुतात्मा झाले आहेत. त्यामध्ये, मुंबईतील रहिवाशी असलेले आणि मूळचे आंध्र प्रदेशचे असलेल्या मुरली नाईक (Martyr Murali Naik) यांना वीरमरण आलं आहे. भारतीय सैन्याचे दुसरे जवान दिनेश शर्मा (Martyr Dinesh Sharma) यांनाही पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानशी लढताना वीरमरण प्राप्त झाले. गोळीबारात जखमी झाल्यानंतर शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशासाठी लढता लढता हे जवान हुतात्मा झाले.
దేశ రక్షణలో శ్రీ సత్యసాయి జిల్లా, పెనుకొండ శాసనసభ నియోజకవర్గం, గోరంట్ల మండలానికి చెందిన మురళి నాయక్ అనే సైనికుడు ప్రాణాలు కోల్పోవడం విషాదకరం. దేశం కోసం ప్రాణాలర్పించిన అమరవీరుడు మురళి నాయక్ కు నివాళులు. ఆయన కుటుంబ సభ్యులకు ప్రగాఢ సానుభూతిని తెలియజేస్తున్నాను. pic.twitter.com/QGtIAxMjug
— N Chandrababu Naidu (@ncbn) May 9, 2025
(हेही वाचा – India Pakistan War : पाकड्यांच्या कुरापती सुरूच; चंदीगडमध्ये वाजले आपत्कालीन सायरन)
जम्मू काश्मीरजवळ पाकिस्तानच्या हल्ल्यात घाटकोपरच्या कामराज नगरमधील रहिवासी मुरली श्रीराम नाईक हे जवान हुतात्मा झाले आहेत. मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी असलेले नाईक कुटुंब हे कामराज नगरच्या (Kamraj Nagar Ghatkopar) झोपडपट्टीमध्ये राहत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी सदरची झोपडपट्टी पुनर्विकासात गेल्याने त्यांची घरे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे, सध्या नाईक यांचे कुटुंब आंध्र प्रदेशाला राहण्यास गेले आहे. मुंबईतील घाटकोपर वार्ड क्रमांक 133 मध्ये मुरली नाईक यांच्या हुतात्मा झाल्याचे बॅनर लावण्यात आले असून त्यांना स्थानिकांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. शुक्रवारी 9 मे रोजी पहाटे 3.00 वाजता झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान मुरली नाईक यांना वीरमरण आल्याचे या बॅनरवरून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ट्वविट करुन हुतात्मा जवान मुरली नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. नाईक हे सत्यसाई जिल्ह्यातील गोरंटला तालुक्यातील रहिवाशी होते. देशासाठी बलिदान देणाऱ्या मुरली नाईक यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, नाईक कुटुंबीयांप्रती सहवेदना आहेत, असे ट्वविट मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community