पहलगाम हल्ल्यानंतर भारताने (India) ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळे उद्ध्वस्त केली. त्यानंतर पाकिस्तानने जो बेछूट गोळीबार सुरु केला आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही क्षेपणास्त्रांचा मारा केला, ज्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. तरीही पाकिस्तान भारतातील (India) नागरी वस्त्यांवर हल्ले करत आहे. त्यामुळे आता हे युद्ध अजून पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अशा वेळी देशसेवेसाठी सीमेवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या आपल्या शेजारी राहणारा कुणी जवान असेल तर कुणाचाही ऊर भरून येईल. अशीच अवस्था सध्या अंधेरीतील विजय नगर सोसायटीतील रहिवाशांची झाली आहे.
सध्याच्या घडीला विजय नगर सोसायटीतील ४ जवान सीमेवर तिन्ही दलांत कार्यरत आहेत. यामध्ये कर्नल संदीप पेंडसे, मेजर जयदीप मसुरेकर, फ्लाईट लेफ्टनंट अश्विन परांजपे आणि सब लेफ्टनंट आदिती काजरेकर यांचा समावेश आहे. या चौघांना रहिवाशांची सॅल्यूट मारला आहे. सोसायटीच्या आवारात फलक लिहिला आहे. त्यावर त्यांनी भारतीय (India) सैन्य दलामध्ये कार्यरत असणाऱ्या विजय नगर सहनिवासांप्रती मनःपूर्वक कृतज्ञता! सद्यस्थितीला उद्भवलेल्या युद्ध परिस्थितीमध्ये भारतीय (India) सैन्य दलाच्या तिन्ही दलांमध्ये कार्यरत असलेल्या आपल्या सहनिवासातील चार जवान भारतीय जनतेच्या सुरक्षेसाठी महान कर्तव्य बजावणाऱ्या या सर्वांना विजय नगर सहनिवासी रहिवाशांतर्फे मानाचा सलाम, असे म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community