India-China : चिनी ड्रॅगनला मागे टाकत बाजारपेठेत भारताचे वर्चस्व

उत्पादकांसाठी भारत हा चीनला पर्याय बनलेला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे भारत सरकारकडून देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादकांना दिल्या जाणाऱ्या सवलती, ज्यामध्ये कर सवलती, सुलभ भूसंपादन आणि भांडवली आधार यांचा समावेश आहे.

183
India-China : चिनी ड्रॅगनला मागे टाकत बाजारपेठेत भारताचे वर्चस्व

आत्मनिर्भर भारताच्या प्रभावामुळे भारतात इतर देशांतून होणारी आयात तर कमी झाली आहेच, पण निर्यातीच्या बाबतीतही भारत आता चीनला अनेक बाजारपेठांमध्ये मागे टाकत आहे. एका नवीन अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की भारताने काही प्रमुख बाजारपेठांमधील इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत चीनचे (India-China) वर्चस्व कमी करण्यास सुरुवात केली आहे.

(हेही वाचा – Maharashtra : महाराष्ट्राला देशात अग्रेसर राहायचे असेल तर राजकारण आणि प्रशासन ताब्यात घ्यावे लागेल; प्रशासकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचे रोखठोक विचार)

भारतात उत्पादनाचा वेग वाढला

इतर देशातील मॅन्यूफॅचरर्स चीन वगळता आशियातील इतर भागांमध्ये पुरवठा साखळ्यांमध्ये (Supply Chain) विविधता आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे भारतात उत्पादनाचा वेग वाढला असून त्याचा फायदा निर्यातीत वाढ होताना दिसत आहे. भारताने इतर देशातील चीनच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीचे प्रमाण कमी केले आहे. त्यात ब्रिटन आणि अमेरिका यांचा समावेश आहे. चीनचा (India-China) या दोन्ही देशांसोबतचा भौगोलिक-राजकीय तणाव वाढल्याचा फायदा भारतीय उत्पादनांना होत आहे.

इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत भारत चीनला मागे टाकणार!

लंडनस्थित फॅथम फायनान्शियल कन्सल्टिंगच्या मते, चीनच्या प्रमाणात भारताची अमेरिकेला इलेक्ट्रॉनिक्सची निर्यात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ७.६५ टक्क्यांपर्यंत वाढली, तर नोव्हेंबर २०२१ मध्ये ती २.५१ टक्के होती. तर ब्रिटनमध्ये ही वाढ ४.७९ टक्क्यांवरून १० टक्के झाली आहे. (India-China)

(हेही वाचा – Navneet Rana : आम्ही योग्य वेळी योग्यच निर्णय घेऊ)

भारत सरकारकडून देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादकांना मिळते सवलत :

मात्र, उत्पादकांसाठी भारत हा चीनला पर्याय बनलेला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे भारत सरकारकडून देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादकांना दिल्या जाणाऱ्या सवलती, ज्यामध्ये कर सवलती, सुलभ भूसंपादन आणि भांडवली आधार यांचा समावेश आहे. यामुळे उत्पादकांना आकर्षित करण्यात सरकारला यश आले आहे, त्यामुळे देशांतर्गत उत्पादन क्षेत्रालाही बूस्टर डोस मिळाला आहे. देशांतर्गत कंपन्यांनीही बाह्य कंपन्यांशी करार करून त्यांचा जागतिक स्तरावर पोहोच मजबूत केला आहे. (India-China)

मेक इन इंडियाची किमया :

स्मार्टफोनच्या बाबतीत, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सकडे भारतातील सर्वात मोठा मोबाइल फोन उत्पादन कारखाना आहे. ऍपल आपल्या सर्व आयफोन्सपैकी किमान ७ टक्के भारतातील त्याच्या कॉन्ट्रॅक्ट उत्पादक फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप आणि पेगाट्रॉन कॉर्पद्वारे बनवते. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या ‘चायना प्लस वन’ धोरणात भारतीय कंपन्या त्यांची भूमिका बजावत आहेत. या अंतर्गत उत्पादक इतर देशांमध्ये बॅक-अप क्षमता विकसित करत आहेत. भारताचा वाढता बाजारहिस्साही ‘मेक इन इंडिया’ योजना यशस्वी करत आहे, त्यामुळे रोजगार आणि निर्यात वाढत असताना आयातही कमी होत आहे. (India-China)

हेही पहा –  

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.