India Canada Conflict : भारत कॅनडा समोर नरमला , ४१ राजदूतांना माघरी बोलावले

सुरक्षेला धोका असल्याच्या कारणास्तव राजदूतांना भारतातून माघारी बोलावले आहे. त्यामुळे दोन देशांतील वाणिज्य दूतावासांमार्फत देण्यात येणाऱ्या सेवांवर परिणाम होईल.

154
India Canada Conflict : कॅनडाने भारतातील ४१ राजदूतांना माघारी बोलावलं, दोन्ही देशांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता
India Canada Conflict : कॅनडाने भारतातील ४१ राजदूतांना माघारी बोलावलं, दोन्ही देशांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता

भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध मागील काही दिवसांपासून तणावाखाली आहेत. यादरम्यान कॅनडाने भारतातील ४१ राजदूतांना माघारी बोलावलं आहे. याआधी भारताने या ४१ राजदूतांना देश सोडण्याची सूचना केली होती. त्यानंतर य़ा राजदूतांना परत बोलवण्यात आले आहे. या दोन्ही देशांमध्ये तणाव आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. (India Canada Conflict)

भारत आणि कॅनडा यांच्याच खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्तेनंतर तणाव सुरू आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी निज्जर याच्या हत्येचा आरोप भारतावर केल्याने हे प्रकरण चांगलंच पेटलं होतं. दरम्यान कॅनडाच्या राजदूतांची २० ऑक्टोबर रोजी संपणार होती. त्यामुळे कॅनडा सरकारने त्यांना पुन्हा मायदेशी बोलावलं आहे. परिणामी कॅनडाच्या मुंबईसहित तीन ठिकाणच्या वाणिज्य दूतावासातील कामे रखडणार आहेत. भारताने जरी कॅनडाच्या राजदुतांना देश सोडण्याचे आदेश दिले असले तरी कॅनडा जशास तसं करणार नाही अशी भूमिका कॅनडाने घेतली आहे. पण हरदीप सिंह निज्जरच्या हत्येची चौकशी सुरुच राहणार, असं कॅनडाने म्हटलं आहे. (India Canada Conflict)

(हेही वाचा : High Profile Case : हाय प्रोफाइल त्वचातज्ञ डॉ. रुबी टंडन वर गुन्हा दाखल )

जूनमध्ये कॅनडामध्ये ४५ वर्षीय खलिस्तान समर्थक हरदीप सिंह निज्जरची हत्या करण्यात आली. कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे शहरातील गुरु नानक शीख गुरुद्वारा साहिबच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी हत्येला दुजोरा देत सांगितले की, निज्जरची दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. निज्जर हा सरे येथील गुरू नानक शीख गुरुद्वारा साहिबचे अध्यक्ष होता आणि भारत सरकारच्या ‘वॉन्टेड’ यादीत त्याचा समावेश होता. (India Canada Conflict)

भारतासोबतचे संबंध ताणले गेल्यानंतर कॅनडाने आपल्या ४१ राजदूतांना माघारी बोलावले आहे. मात्र, कॅनडाने चंदीगड, मुंबई आणि कर्नाटकातील कॉन्सुलेट सेवा बंद करण्याचा निर्णयही घेतला आहे. त्यांच्या परराष्ट्र मंत्री जोली यांनी ही माहिती दिली. सुरक्षेला धोका असल्याच्या कारणास्तव राजदूतांना भारतातून माघारी बोलावले आहे. त्यामुळे दोन देशांतील वाणिज्य दूतावासांमार्फत देण्यात येणाऱ्या सेवांवर परिणाम होईल. दुर्दैवाने आम्हाला चंदीगड, मुंबई आणि बंगळुरूतील कॉन्सुलेटमधील सर्व सेवांवर बंदी आणावी लागली आहे, असेही त्या म्हणाल्या.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.