Index of Industrial Production : देशातील औद्यौगिक उत्पादन निर्देशांक ३.७ टक्क्यांपर्यंत घसरला

86
Index of Industrial Production : देशातील औद्यौगिक उत्पादन निर्देशांक ३.७ टक्क्यांपर्यंत घसरला

ऋजुता लुकतुके

देशाच्या औद्योगिक उत्पादकतेचा किंवा घडामोडींचा निदर्शक असलेला औद्योगिक उत्पादन निर्देशांक (Index of Industrial Production) जून महिन्यात ३.७ टक्के असल्याचं सांख्यिकी मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेमोडीत स्पष्ट झालं आहे. हा मागच्या तीन महिन्यातील नीच्चांक आहे. वर्तवलेल्या ५ टक्के अंदाजापेक्षा हा आकडा खूपच खालावला आहे.

मे महिन्यात औद्योगिक वाढ ५.२ टक्के होती.

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मिळून देशाच्या औद्‌योगिक (Index of Industrial Production) उत्पादनात ४.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०२२ मध्ये याच कालावधीत ही वाढ १२.९ टक्के इतकी होती.

औद्योगिक उत्पादन का घटलं?

उत्पादन क्षेत्राचं अपयश हे महत्त्वाचं कारण म्हणावं लागेल. कारखान्यातील उत्पादन या कालावधीत घटलं आणि उत्पादनाचा वृद्धीदर ३.१ टक्के (Index of Industrial Production) इतका कमी राहिला. भांडवली वस्तूंचं उत्पादन तर फक्त २ टक्क्यांनी वाढलं. औद्योगिक उत्पादन निर्देशांक मोजताना त्यात उत्पादन क्षेत्राचा हिस्सा सगळ्यात मोठा आहे. हा वाटा ३/4 पेक्षाही मोठा आहे. त्यामुळे उत्पादन क्षेत्राची कामगिरी खालावल्यावर औद्योगिक उत्पादन निर्देशांकावर त्याचा परिणाम अटळ होता.

मे महिन्यात उत्पादन क्षेत्राने ५.८ टक्क्यांची वाढ नोंदवली होती.

याउलट जूनच्या महिन्यात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे खाणकाम आणि ऊर्जा निर्मिती क्षेत्राने या (Index of Industrial Production) महिन्यात चांगली कामगिरी बजावली आहे. गेल्यावर्षी या क्षेत्रातील वाढ ६.४ टक्के होती. ती यंदा ७.६ टक्के नोंदवली गेली. तर ऊर्जा क्षेत्रात तब्बल ४.२ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.

‘उत्पादन क्षेत्राने मिळालेली गती कायम राखायला हवी होती. पण, (Index of Industrial Production) जून महिन्‍यातील आकड्यांनी त्या बाबतीत निराशच केलं आहे. निर्यातीत देशातल्या वस्त्रोद्योगाचा वाटा नेहमी मोठा असतो. पण, यंदा तिथेही तुलनेनं निराशाच पदरी पडली आहे. सातत्य हा आर्थिक विकासात महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे,’ असं मत ॲक्युट रेटिंग अँड रिसर्च संस्थेच्या मुख्य अर्थतज्ज सुमन चौधरी यांनी व्यक्त केलं आहे.

(हेही वाचा – BWF World Championship : बॅडमिंटन विश्वविजेतेपदाच्या स्पर्धेत सिंधू, साईसात्विक आणि चिरागला पहिल्या फेरीत बाय)

तर केअर एज संस्थेच्या अर्थतज्ज रजनी सिन्हा यांनीही वस्त्रोद्योग आणि तयारी कपड्यांच्या उद्योगात झालेली घसरण (Index of Industrial Production) चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे. उलट धातू उत्पादनात निर्यात वाढली हे यशही त्यांनी अधोरेखित केलं.

महत्त्वाचं म्हणजे जूनच्या आकड्यांमध्ये ग्राहकोपयोगी वस्तूंचं उत्पादन गेल्‍यावर्षीच्या तुलनेत ६.९ टक्क्यांनी (Index of Industrial Production) कमी झालं आहे. ही घसरण सहा महिन्यातील नीच्चांकी आहे.

क्रेडिट रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या मते औद्योगिक घडामोडी जुलै (Index of Industrial Production) महिन्‍यात वाढलेल्या होत्या. आणि त्यामुळे जुलैचे आकडे समाधानकारक असतील. आणि ते ४-६ टक्क्यांच्या दरम्यान असतील. खासकरून धातू उत्पादनं आणि वाहनांची विक्री जुलैमध्ये वाढली असल्याचा संस्थेचा दावा आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.