-
प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण (बार्टी) संस्थेत मागील १२ वर्षांपासून मानधनावर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात महागाई भत्त्यानुसार ४६ टक्के वाढ करण्यात आली आहे. हे कर्मचारी अनेक वर्षापासून मानधनावर काम करत आहेत. या वाढीमुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. (Bharti News)
(हेही वाचा – Ceasefire : युध्दविरामानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…)
वाढत्या महागाईमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी लक्षात घेता ही वाढ अत्यंत आवश्यक होती. या निर्णयामुळे जात पडताळणी कार्यालये, बार्टी मुख्यालय, उपकेंद्रे तसेच सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीच्या मागणीवर समाधानकारक तोडगा निघाला आहे. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय म्हणजे सामाजिक न्यायाची खरी अंमलबजावणी असल्याची भावना सर्व कर्मचाऱ्यांनी व्यक्त करुन मंत्री शिरसाट यांचे आभार मानले आहेत. (Bharti News)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community