
-
प्रतिनिधी
काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जवानांनी राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या सर्जिकल कारवाईनंतर संपूर्ण देशात देशभक्तीचा लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील गिरगाव परिसरात वीरमाता अनुराधा गोरे आणि समाजसेविका डॉ. मंजू लोढा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात प्रथमच ‘सिंदूर यात्रा’ काढण्यात आली. (Sindoor Yatra)
ही यात्रा केवळ श्रद्धांजली नव्हे, तर स्त्रीशक्तीच्या राष्ट्रभक्तीचा शक्तिप्रदर्शन ठरली. मणीभवन चौक ते हिरोज ऑफ किलाचंद उद्यान या मार्गावर हजारो महिलांनी लाल साड्यांमध्ये, हाती राष्ट्रध्वज घेऊन उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. ‘भारत माता की जय, वंदे मातरम्’, आणि जवानांचा जयजयकार करीत परिसर दणाणून गेला. (Sindoor Yatra)
(हेही वाचा – Mumbai BJP च्या अध्यक्षपदावर कोण? राजकीय खेळात नवा ट्विस्ट!)
यात्रेदरम्यान महिलांनी चिनी आणि तुर्कस्तानी वस्तूंवर पूर्ण बहिष्कार टाकण्याची शपथ घेतली. पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या देशांची उत्पादने खरेदी न करण्याचा निर्धार या यात्रेतून व्यक्त झाला. अनुराधा गोरे म्हणाल्या, “हुतात्म्यांचे बलिदान वाया जात नाही, त्यातूनच नवे वीर घडतात. नारीशक्तीने सैनिकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं ही काळाची गरज आहे.” (Sindoor Yatra)
डॉ. मंजू लोढा यांनीही सैनिक कुटुंबीयांच्या महत्त्वावर भर दिला. “प्रत्येक भारतीयाने वर्षातील एक सण जवानांच्या घरी साजरा करावा, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी हा छोटा पण महत्त्वाचा टप्पा असेल,” असं त्या म्हणाल्या. यात्रेत कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा, माजी सैनिक, जवानांचे कुटुंबीय, अभिनेत्री मेघा धाडे, मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि विविध वयोगटांतील महिलांनी सहभाग घेत देशभक्तीचा उधाण निर्माण केलं. ‘सिंदूर यात्रा’ मधून फक्त देशप्रेमच नव्हे, तर जागरूक ग्राहक म्हणून राष्ट्रहित जपण्याची जबाबदारी महिलांनी लिलया पेलल्याचे दर्शन घडले. (Sindoor Yatra)
मागाठाण्यातही निघाली ‘सिंदूर यात्रा’
‘ऑपरेशन सिंदूर’च्या प्रचंड यशानंतर भारतीय सैन्याच्या पराक्रमास सलाम करण्यासाठी मागाठाणे विधानसभा क्षेत्रात मंगळवारी राष्ट्रभक्तीने भारलेली ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली. भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेत हजारो नागरिक, युवक-युवतींनी हातात तिरंगा घेत जयघोष करीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ही यात्रा फक्त एक कार्यक्रम नव्हता, तर देशप्रेमाचा ज्वालामुखी होता! गावडे नगरपासून सुरू होऊन कोकणीपाडा, मंदाकिनी नाका, अशोक वन, देवीपाडा, ठाकूर व्हिलेजसह अनेक भागांतून मार्गक्रमण करत संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या घोषणांनी दणाणून गेला.
यात्रेच्या वेळी बोलताना आमदार प्रविण दरेकर म्हणाले, “देशावर जेव्हा धोका निर्माण होतो, तेव्हा भारतीय सैन्य शांत बसत नाही. पाकिस्तानच्या भूमीत घुसून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करणारे आमचे वीर हे खरे हिरो आहेत. त्यांच्या शौर्यास मानवंदना देण्यासाठी ही तिरंगा यात्रा आहे. ही जनता स्वयंस्फूर्तपणे काढतेय, कारण देशभक्ती हृदयात आहे.” दरेकर पुढे म्हणाले की, “ही फक्त मागाठाणेची यात्रा नाही, तर संपूर्ण देशभरातून निघणाऱ्या लाखो तिरंगा यात्रांचा भाग आहे. यातून एक स्पष्ट संदेश जात आहे – देशाच्या संरक्षणासाठी आम्ही एकदिलाने उभे आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे आणि आमची निष्ठा देशासोबत आहे.” या यशस्वी यात्रेला मुंबई भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, जिल्हा सचिव मोतीभाई देसाई, मंडळ अध्यक्ष अमित उतेकर, तसेच हजारोंचे लोंढेप्रमाणे आलेले कार्यकर्ते व नागरिक यांनी साथ दिली. तिरंगा, घोषणाबाजी आणि देशप्रेमाने वातावरण भारून गेले होते. देशभक्तीचं हे दृश्य फक्त डोळ्यांनी नाही, तर मनाने अनुभवण्यासारखं होतं!
हेही पहा –
Join Our WhatsApp Community