PM Narendra Modi : AI हे वेगाने प्रगती करत आहे ; नागरिकांनी या तंत्रज्ञानाबाबत सतर्क राहायला हवं

टेक्नॉलॉजी हा जीवनाचा अभूतपूर्व भाग झाला आहे. त्यामुळे तंत्रज्ञान आयात न करणे आणि त्याच्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहू नये असे भारताचे लक्ष्य असायला हवे.

146
PM Narendra Modi : AI हे वेगाने प्रगती करत आहे ; नागरिकांनी या तंत्रज्ञानाबाबत सतर्क राहायला हवं
PM Narendra Modi : AI हे वेगाने प्रगती करत आहे ; नागरिकांनी या तंत्रज्ञानाबाबत सतर्क राहायला हवं

मंगळवारी (१९ डिसेंबर)  स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचा (Smart India Hackathon) अहमदाबाद येथे अंतिम सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांनी एआय (AI technology) या तंत्रज्ञानबद्दल चर्चा केली. एआय हे वेगाने प्रगती करत असून नागरिकांनी या तंत्रज्ञानाबाबत सतर्क राहायला हवं असे सांगितले. (PM Narendra Modi)

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे वेगाने बदलते आहे. एका समस्येवर उपाय शोधला असता दुसरी समस्या उभी राहते. कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाबाबत (Technology) आपण सतर्क राहाणे गरजेचे आहे. जर नियमांचे पालन करून हे तंत्रज्ञान वापरले तर त्याचा भरपूर फायदा होऊ शकतो. मात्र जर चुकीच्या पद्धतीने याचा वापर केला तर कित्येक समस्या निर्माण होऊ शकतात. ( PM Narendra Modi)

डीपफेक व्हिडिओबाबत सतर्कता बाळगा 

डीपफेक व्हिडिओ (Deepfake video) हे अगदी खरे वाटतात. त्यामुळे कोणत्याही फोटो किंवा व्हिडिओवर विश्वास ठेवण्यापुर्वी आपल्याला विचार करण्याची गरज आहे. यासाठी भारत एक वैश्विक आराखडा तयार करत आहे. असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

(हेही वाचा : Maratha Reservation: मराठा, धनगर आरक्षणाबाबत उदयनराजेंनी घेतली पंतप्रधानांची भेट)

‘स्टडी इन इंडिया’ अभियान

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन शेवटची फेरी अहमदाबाद मध्ये पार पडली. यावेळी पंतप्रधान मोदी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थित होते. उच्चशिक्षणासाठी भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही ‘स्टडी इन इंडिया’ अभियान सुरू केलं आहे.” असंही ते म्हणाले.
पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले की भारताकडे जगातील सर्वात मोठं प्रतिभेचं भांडार आहे. जगाचा भारतावर विश्वास आहे. जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत टिकाऊ आणि व्यापक उपाय देऔ शकतो. टेक्नॉलॉजी हा जीवनाचा अभूतपूर्व भाग झाला आहे. त्यामुळे तंत्रज्ञान आयात न करणे आणि त्याच्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहू नये असेही त्यांनी सांगितले. तंत्रज्ञानाबाबत ‘आत्मनिर्भर’ होण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.