cement concrete: एका वर्षांत मुंबईतील १५८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण

 डिसेंबर २०२३ पर्यंत काँक्रिटच्या रस्त्यांचे प्रमाण वाढणार 

126
cement concrete एका वर्षांत मुंबईतील १५८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण
cement concrete एका वर्षांत मुंबईतील १५८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण

मुंबई महापालिकेच्यावतीने तब्बल ३४ वर्षांपूर्वी रस्त्यांचा विकास करून दर्जेदार रस्ते बनवण्यासाठी सिमेंट काँक्रिटीकरणाची cement concrete: कामाला सुरुवात करण्यात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत मुंबईतील ११४८ किलोमीटर लांबीचे रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यात आले आहे. त्यामुळे आजवर जिथे सरासरी ५० ते ६० किलोमीटर लांबीचे सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनवले जात होते, तिथे मागील वर्षभरात १५८ किलोमीटरच्या सिमेंट काँक्रिटच्या  रस्त्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे एक वर्षांत आजवरच्या सरासरी किलोमीटरच्या तुलनेत  तिप्पट सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचे काम पूर्ण करत महापालिका प्रशासन मुंबईच्या रस्त्यांच्या विकासाचा मैलाचा दगड पूर्ण करण्यास गती देताना दिसत आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने १९८९ मध्ये रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटच्या cement concrete: कामाला सुरुवात करण्यात आली.  डिसेंबर २०२१ पूर्वी मुंबईत साधारण ९९० कि.मी. रस्त्यांचे सिमेंट  कॉक्रिटीकरण झालेले होते. जानेवारी २०२२ मध्ये जवळपास २१० किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यातील जानेवारी २०२२ ते मे २०२३ दरम्यान शहर  विभागामध्ये ५९  कि.मी.पश्चिम  उपनगरामध्ये  ६४ कि.मी.  तर   पूर्व  उपनगरांमध्ये ३५ कि.मी. असे मुंबईत एकूण १५८ कि.मी.रस्त्यांचे कॉक्रिटीकरण करण्यात आले आहे.  एकूण २६५ कि.मी. रस्त्यांच्या कॉक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते, त्यापैकी १५८ कि.मी. रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे अशाप्रकारे मुंबईत एकूण २ हजार किलोमीटर रस्त्यांपैंकी ११४८ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट कॉक्रिटीकरण झाले असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. अशाप्रकारची माहिती खुद्द महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे.मागील काही महिन्यांपूर्वी मुंबई महापालिकेच्यावतीने सुमारे २०० किलोमीटर लांबीच्या रस्ते काँक्रिटीकरण कामांसाठी शहर आण  पूर्व उपनगरांसाठी प्रत्येकी एक आणि पश्चिम उपनगरांसाठी तीन अशाप्रकारे पाच कंत्राटदारांची निवड केली आहे.

(हेही वाचा : Independence Day : महाराष्ट्र मिलिटरी स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन आणि शाळेचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न)

 डिसेंबर २०२३ पर्यंत काँक्रिटच्या रस्त्यांचे प्रमाण वाढणार 

महापालिकेकडून हाती घेण्यात येणाऱ्या सुमारे ४०० किलोमीटर लांबीच्या रस्ते काँक्रिटीकरणामध्ये पश्चिम उपनगरांमधील ५१६ रस्ते, शहर भागातील २१२ रस्ते आणि ८५ तुटलेले काँक्रिट रस्त्यांचे भाग तसेच पूर्व उपनगरांमधील १८२ रस्त्यांचा समावेश आहे. या पाचही कामांसाठी स्वतंत्र कंत्राटदारांची निवड कंत्राटदारांची निवड करण्यात आली. यासर्व ३९७ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी विविध करांसह सुमारे ८३१९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत्यापैंकी ५२ रस्त्यांची कामे पावसाळ्यानंतर पूर्ण केली जाणार आहेत. त्यामुळे येत्या डिसेंबर २०२३ पर्यंत या कामाला अधिक गती मिळून काँक्रिटच्या रस्त्यांचे प्रमाण वाढलेले पहायला मिळेल,असा विश्वास रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.