Dombivli : डोंबिवलीकरांची पेट्रोल पंप मालकाकडून लूट; पाणी मिश्रित पेट्रोलची विक्री? डोंबिवलीकर संतप्त

363
Dombivli : डोंबिवलीकरांची पेट्रोल पंप मालकाकडून लूट; पाणी मिश्रित पेट्रोलची विक्री? डोंबिवलीकर संतप्त
Dombivli : डोंबिवलीकरांची पेट्रोल पंप मालकाकडून लूट; पाणी मिश्रित पेट्रोलची विक्री? डोंबिवलीकर संतप्त

मुंबई – डोंबिवली पूर्वेतील उस्मा पेट्रोल पंप मालकाकडून वाहन चालकांच्या सुरू असलेल्या लुटीचा पर्दाफाश वाहन चालकाकडून करण्यात आला आहे. या पेट्रोल पंपावर पाणी मिश्रित पेट्रोलची सर्रासपणे विक्री करून डोंबिवलीकरांची फसवणूक करणाऱ्या उस्मा पेट्रोल पंपावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी डोंबिवलीकरांकडून करण्यात येत आहे.

डोंबिवलीकरांसाठी सर्वात जवळ असणारा पेट्रोल पंप म्हणजे पेंढाकर कॉलेजच्या पुढे असणारा ‘उस्मा पेट्रोल पंप’ या पंपावर लहान मोठी अशी शेकडो वाहन चालक पेट्रोल भरण्यासाठी येत असतात. दिवसभर या पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. मागील काही आठवड्यापासून उस्मा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या वाहन चालकांच्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. उस्मा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यानंतर काही अंतरावर वाहने बंद पडत असून ही वाहने बंद पडण्याचे कारण वाहन चालकांनी शोधले असता पेट्रोलच्या टाकीत मोठ्या प्रमाणात पाणी मिश्रीत पेट्रोल आढळून आले आहे. एका लिटर मागे पाव लिटर पाण्याचे प्रमाण वाहनांच्या पेट्रोल टाकीत आढळून आले आहे.

(हेही वाचा – रायगड जिल्ह्यात पादत्राणे आणि चर्मोद्योग क्लस्टर, केंद्र शासनाकडून १२५ कोटी मंजूर)

या पेट्रोल पंपावर संतप्त वाहन चालकांचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये संतप्त वाहन चालकांनी आपल्या वाहनातील पेट्रोल बॉटलमध्ये काढून त्यात असलेल्या पाण्याचे प्रमाण दाखविण्यात येत आहे. मोठ्या वाहन चालकांनी बादलीत काढलेल्या पेट्रोलमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे डोंबिवलीकर वाहन चालकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून पेट्रोल पंपावर कारवाई करण्यात यावी अशी संतप्त प्रतिक्रिया वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.

उस्मा पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, या पाणी मिश्रित पेट्रोलच्या तक्रारी पावसाळा सुरू झाल्यापासून येत आहेत. पेट्रोलच्या टाक्या जमिनीत असल्यामुळे कुठेतरी त्या लिकेज होऊन टाकीत पाणी जात असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत पेट्रोल पंप व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही, तसेच स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.