
-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक गणेश मंडळाच्या प्लास्टर ऑफ पॅरिसरच्या अर्थात पीओपीच्या उंच मूर्तींचे विसर्जन कसे करावे याबाबत महाराष्ट्र शासनाला तोडगा काढण्याचे आदेश दिले आणि पुढील तारीख ३० जून ठेवली आहे. त्यामुळे सार्वजनिक उत्सव मंडळांच्या मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक तलावांमध्ये करण्याबाबत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्यावतीने कार्यप्रणालीचा मसुदा सादर केला जाणार आहे. त्यामुळे या कार्यप्रणाली मसुद्यात आपल्या काही सूचना असल्यास येत्या १८ जूनपर्यंत केल्या जाव्यात अशाप्रकारचे आवाहनच समन्वय समितीच्यावतीने सर्व उत्सव मंडळांना करण्यात आले आहे. (Murti Visarjan)
बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीच्यावतीने सर्व गणेश मंडळांना आवाहन करून करण्यात आले असून यामध्ये येत्या १८ जून पूर्वी आपल्या सर्व सूचना इमेल [email protected] वर सादर केल्या जाव्यात अशाप्रकारे अशाप्रकारचे आवाहन समन्वय समितीने केले आहे. समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर आणि प्रमुख कार्यवाह कार्यवाह गिरीश वालावलक यांच्या स्वाक्षरीने केले. (Murti Visarjan)
(हेही वाचा – BMC School मधील मुलांची पाठ रात्रीही सोडली जाणार नाही; काय आहे कारण जाणून घ्या)
उच्च न्यायालयाने ९ जून २०२५ रोजी निर्णय दिला असून या निर्णयानुसार प्लास्टर ऑफ पॅरीस (पीओपी) च्या गणेश मूर्तीवरील बंदी उठवली आहे. या निर्णयाचे समितीने गणेश मंडळाच्यावतीने स्वागत केले आहे. परंतु आपल्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या उंच मूर्तीचे नैसर्गिक जल स्त्रोतात विसर्जन होणे आवश्यक असल्याने आपण शासनाकडे तशी मागणी केली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांच्या उंच मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जन करणे अडचणीचे होईल असे आपण शासनास कळवले आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुका निघतात, यात लाखोच्या संख्येने गणेशभक्त सहभागी असतात. समुद्रावर प्रचंड जनसमुदायाचे नियोजन करता येते, मात्र कृत्रिम तलावांच्या ठिकाणी मर्यादित जागेमध्ये या प्रचंड गर्दीचे नियोजन कशा प्रकारे केले जाणार आहे. कृत्रिम तलावाशेजारी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असू शकते. अशा ठिकाणी चेंगराचेंगरी अथवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी प्रशासनाला घ्यावी लागेल, असे नमुद केले आहे. (Murti Visarjan)
उच्च न्यायालयाने सार्वजनिक गणेश मंडळाच्या पीओपी च्या उंच मूर्तीचे विसर्जन कसे करावे या बाबत न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला तोडगा काढण्याचे आदेश दिले होते व पुढील तारीख ३० जून ठेवली आहे. ही बाब विचारात घेता समन्वय समिती आपल्या गणेश मूर्तीचे विसर्जन नैसर्गिक जलस्त्रोतात करण्याबाबत समिती मानक कार्यप्रणाली (एसओपी) चा मसुदा शासनाकडे सादर करणार आहे. आपणास विनंती करण्यात येते की, एसओपीमध्ये आपणाकडून काही सूचना, नियम सुचवायचे असेल तर त्वरित आपण समितीच्या वतीने देण्यात आलेल्या इमेलवर पाठवण्यात याव्यात असे आवाहन केले आहे. (Murti Visarjan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community