Rahul Shewale : शीव रेल्वे स्थानकावरील पूल पाडण्यास तुर्तास स्थगिती, शेवाळेंच्या रेल्वे आणि महापालिकेला सूचना

स्थानिक जनतेचा विकासाला विरोध नाही, मात्र कोणतीही कारवाई करताना स्थानिक जनतेला विश्वासात घ्या, अशी विनंतीही खासदारांनी प्रशासनाला केली.

650
Rahul Shewale : शीव रेल्वे स्थानकावरील पूल पाडण्यास तुर्तास स्थगिती, शेवाळेंच्या रेल्वे आणि महापालिकेला सूचना
Rahul Shewale : शीव रेल्वे स्थानकावरील पूल पाडण्यास तुर्तास स्थगिती, शेवाळेंच्या रेल्वे आणि महापालिकेला सूचना

मुंबईच्या शीव रेल्वे स्थानकावरील रोड ओव्हर ब्रीज अर्थात आरओबी पाडण्याच्या कामाला तूर्तास स्थगिती देण्याची सूचना शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी रेल्वे आणि मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या. स्थानिक जनतेचा विकासाला विरोध नाही, मात्र कोणतीही कारवाई करताना स्थानिक जनतेला विश्वासात घ्या, अशी विनंतीही खासदारांनी प्रशासनाला केली. (Rahul Shewale)

(हेही वाचा – Rani LakshmiBai Autobiography: झाशीची राणी लक्ष्मीबाई शौर्यगाथेच्या हिंदी आवृत्तीचे २९ जानेवारीला प्रकाशन)

शीव उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने या पुनर्बांधणीच्या कामासाठी या पुलाचे बांधकाम तोडण्यात येणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी वाहतुकीचे मार्ग निश्चित करून वळवण्यात आले आहे. त्यामुळे या संदर्भात स्थानिक खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी आपल्या चेंबूर येथील जनसंपर्क कार्यालयात एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी मध्य रेल्वे, मुंबई महानगरपालिका एफ (उत्तर), जी (उत्तर) विभाग, रस्ते व वाहतूक विभाग आणि पुल विभाग, तसेच वाहतूक पोलीस विभाग यांचे वरिष्ठ अधिकारी आणि धारावीतील स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर हे रस्ता पूल तुर्तास पाडण्यात येणार नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती खासदार शेवाळे (Rahul Shewale) यांनी यावेळी दिली. (Rahul Shewale)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.