
-
ऋजुता लुकतुके
पाकिस्तानला पुन्हा एकदा आंतरारष्ट्रीय नाणेनिधीकडून दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्यातच, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला १ अब्ज डॉलरचं कर्ज दिले होते. विस्तारित निधी सुविधा कार्यक्रमांतर्गत पाकिस्तानला १.०२ अब्ज डॉलर म्हणजे सुमारे ८,४०० कोटी रुपयांचा दुसरा हप्ताही आता देण्यात आला आहे. सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यामुळे पाकिस्तानने कर्जाची मागणी केली होती. (IMF Loan To Pakistan)
स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने म्हटले आहे की, १६ मे रोजी संपणाऱ्या आठवड्यासाठी ही रक्कम देशाच्या परकीय चलन साठ्यात समाविष्ट केली जाईल. गेल्या आठवड्यात, आयएमएफच्या बैठकीत, पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या निधीवरील मतदानापासून दूर राहून भारताने निषेध केला होता. इथे तुम्हाला एकतर बाजूने मतदान करावे लागेल किंवा मतदानापासून स्वतःला दूर ठेवावे लागेल. यावर चिंता व्यक्त करताना भारताने म्हटले होते की पाकिस्तान या पैशाचा वापर सीमापार दहशतवादाला चालना देण्यासाठी करू शकतो. या आर्थिक मदतीमुळे पाकिस्तान मोठ्या कर्जात बुडाला आहे आणि तो आयएमएफचा मोठा कर्जदार बनला आहे. (IMF Loan To Pakistan)
(हेही वाचा – शिवाजी पार्क ओपन जिमनॅशिअम व नागरिक संघाच्या संयुक्त विद्यमाने ‘Operation Sindoor’च्या सन्मानार्थ तिरंगा यात्रा संपन्न)
पाकिस्तान सध्या आर्थिक संकटातून जात आहे. देशाच्या परकीय चलन साठ्यातही सातत्याने घट होत आहे. शिवाय, येथे महागाईही गगनाला भिडत आहे. आयएमएफकडून मिळणारा निधी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला आधार देईल, परंतू, दरम्यानच्या काळात भारतासोबतच्या युद्धात पाकिस्तानचे खूप नुकसान झाले आहे. एका अहवालानुसार, या समस्यांना तोंड देणाऱ्या पाकिस्तानवर डिसेंबर २०२४ पर्यंत सुमारे १३१.१६ अब्ज डॉलर्सचे परकीय चलन कर्ज आहे. (IMF Loan To Pakistan)
१० मे रोजी आयएमएफकडून पाकिस्तानसाठी १ अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्यात आले होते. कर्जाची मंजुरी ही अत्यंत महत्त्वाची असल्याचं शाहबाज शरीफ यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सुधारत असून देश विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात येतंय. दरम्यान, भारताकडून पाकिस्तानला मदत देण्यासंदर्भात विरोध करण्यात आला होता. एकीकडे भारत पाकिस्तानला सर्व बाजूंनी घेरत असल्याचं चित्र आहे. अशातच भारताचा विरोध असताना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफने पाकिस्तानला कर्ज देण्यास मान्यता दिली आहे. मात्र पाकिस्तान या निधीचा वापर दहशतवादी कारवायांना पाठिंबा देण्यासाठी करत असल्याची शक्यता भारताकडून करण्यात आली आणि त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानला कर्ज देण्यास भारतानेविरोध केला होता. आयएमएफच्या मतदानासाठीही भारत अनुपस्थित राहिला होता. (IMF Loan To Pakistan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community