बकरी ईदच्या (Bakri Eid) पार्श्वभूमीवर अनेक बकऱ्यांची कत्तल सुरु झाली आहे. बकऱ्यांची वाहतूकही वाढली आहे. मुंबई लोकलमधील (Mumbai Local) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कुर्ला स्टेशनवर (Kurla Station) २ धर्मांध बकऱ्यांना लोकलच्या मालडब्यात चढवत असल्याचे दिसून येत आहे ही लोकल कल्याणच्या दिशेने जाणारी होती. अशा प्रकारे खुलेआम बकरे रेल्वे प्लॅटफॉर्मवर आणि डब्यांमध्ये आणले जात असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
याविषयी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी लोकलमधून अशाप्रकारे बकऱ्यांची वाहतूक करणे अवैध असल्याचे सांगितले. ७ जूनला बकरी ईद असल्यामुळे देवनार मार्केटमधून बकरी खरेदी करून अन्यत्र वाहतूक करण्याचे प्रकार वाढले आहेत.
बकरी ईद आणि त्यावेळी होणाऱ्या रक्तपातामुळे निर्माण होणारे वाद, हे समीकरण नवीन नाही. सोसायटीमध्ये बकऱ्यांचा बळी देणे, उच्चभ्रू सोसायटीत बकरे आणून येण्या-जाण्याच्या वाटेवर बांधणे यांमुळे मुंबईत यापूर्वीही अनेक वाद झालेले आहेत. असे असूनही हिंदूबहुल सोसायट्यांमध्येही अरेरावी करून उघड्यावर बकरे कापण्याचे प्रकार घडत आहेत. प्रशासनाने या प्रकारांकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. (Mumbai Local)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community