मुसलमान देशातील कायद्यात राहिले, तर फायद्यात रहातील; Dhirendra Shastri यांचा इशारा

106
मुसलमान देशातील कायद्यात राहिले, तर फायद्यात रहातील; Dhirendra Shastri यांचा इशारा
मुसलमान देशातील कायद्यात राहिले, तर फायद्यात रहातील; Dhirendra Shastri यांचा इशारा

Dhirendra Shastri : हिंदुस्थानमध्ये राहणारा प्रत्येक जण हिंदू आहे. आम्ही मुस्लिम विरोधी नाही. या देशाने एपीजे अब्दुल कलाम (APJ Abdul Kalam) यांना स्वीकारले. तसेच इतरांनाही स्वीकरले. परंतु आज भयप्रद वातावरणामुळे पश्चिम बंगालमधून हिंदू पलायन करीत आहेत. उद्या महाराष्ट्रमध्ये करतील. पुढे मध्य प्रदेशमध्ये होईल. एका विशेष समुदायाकडून हिंदुना घाबरवण्याचे प्रयत्न येथील सरकारच्या मदतीने सुरू आहे, हे निंदनीय आहे. मुस्लिम या देशातील कायद्यात राहिले तर फायद्यात राहतील, असे पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी म्हटले आहे.  (Dhirendra Shastri)

(हेही वाचा – ‘पश्चिम बंगालमध्ये येऊन जागा दाखवू’; भाजपाच्या Navneet Rana यांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल)

देशातील दुसरे आणि महाराष्ट्रातील पहिले श्री बागेश्वर बालाजी सनातन मठ भिवंडीतील (Sri Bageshwar Balaji Sanatan Math, Bhiwandi) हायवे दिवे येथे तयार झाले. श्री बागेश्वर मठाचे मठाधिपती पंडित धीरेंद्र कृष्णा शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली बनवण्यात आलेल्या श्री बागेश्वर बालाजी सनातन (Sanatan) मठाचा लोकार्पण सोमवारी १४ एप्रिल रोजी तयार झाले. यावेळी धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्वसाधारण गोरगरीब बागेश्वर बालाजी भक्तांना मध्यप्रदेश (Madhya Pradesh) येथे जाणे शक्य होत नाही, अशा भक्तांसाठी भिवंडी येथील बागेश्वर बालाजी धाम ही पर्वणी आहे. हे मठ सनातन धर्म प्रसाराचे केंद्र व भक्तांसाठी आस्थेचे श्रद्धास्थान बनणार आहे, असे प्रतिपादन बागेश्वर बालाजी धामचे प्रमुख धोरेंद्र महाराज शास्त्री यांनी केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.