IAS Officers Transfer : राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ आठ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

590
सरकारकडून प्रशासकीय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरुच ठेवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात पुन्हा सत्तेत आलेल्या सरकारकडून गेल्या पाच सहा महिन्यांपासून बदल्यांचं (Transfer) सत्र सुरु आहे. राज्य सरकारकडून मंगळवारी १० जून या दिवशी प्रशासनात मोठे बदल करताना आठ वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. (IAS Officers Transfer)

(हेही वाचा – Maharashtra Politics : अमरावतीत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! माजी आमदार ज्ञानेश्वर धाने-पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश)

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची माहिती खालीलप्रमाणे : 
  • नितीन पाटील (IAS:SCS:2007) आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई यांना महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
  • ए.बी. धुळाज (IAS:SCS:2009) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई यांना सचिव, ओबीसी बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
  • लहू माळी (IAS:SCS:2009) व्यवस्थापकीय संचालक, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, मुंबई यांना आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
  • बाबासाहेब बेलदार (IAS:SCS:2015) अतिरिक्त विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर विभाग यांना महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
  • मुरुगनंथम एम. (IAS:RR:2020) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • आदित्य जीवने (IAS:RR:2021) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांची सहव्यवस्थापकीय संचालक, MAHADISCOM, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • मिन्नू पी.एम. (IAS:RR:2021) सहायक जिल्हाधिकारी, भातकुली-तिवसा उपविभाग, अमरावती यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या आधी कोणत्या अधिकाऱ्यांची बदली झाली होती?
  • नवल किशोर राम (IAS:RR:2008) – आयुक्त, पुणे महानगरपालिका
  • आनंद भंडारी (IAS:NON-SCS:2017) मुख्य कार्यकारी अधिकारी, अहिल्यानगर जिल्हा परिषद
  • जे.एस. पापळकर (IAS:SCS:2010) – विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजी नगर
  • सी.के. डांगे (IAS:SCS:2010) – सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, सामान्य प्रशासन विभाग
  • शीतल तेली-उगले (IAS:RR:2009) – क्रीडा आणि युवा आयुक्त, पुणे
  • भाग्यश्री विसपुते (IAS:RR:2017) जिल्हाधिकारी, धुळे
  • आशिष येरेकर (IAS:RR:2018) जिल्हाधिकारी, अमरावती
हेही पहा  –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.