भारतीय हवाई दलाने (IAF) पाकिस्तानला चीनने पुरवलेल्या हवाई संरक्षण प्रणालींना बायपास करून उद्ध्वस्त केले. वरिष्ठ सरकारी सूत्रांनुसार, भारतीय सैन्याने कारवाईदरम्यान प्रगत चिनी PL-15 हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि तुर्की मूळचे यिहा ड्रोन देखील पाडले, असे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने एका प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे.
(हेही वाचा Republic of Balochistan : स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी होत असताना आता #Republic of Balochistan ट्रेंडिंगवर)
भारतीय मालमत्तेचे कोणतेही नुकसान न होता अंमलात आणलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या स्वदेशी शस्त्रास्त्रांनी नूर खान आणि रहिमयार हवाई तळांसह प्रमुख पाकिस्तानी लष्करी ठिकाणांवर हल्ला केला. तणावाच्या काळात धोक्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी दहा भारतीय उपग्रह चोवीस तास कार्यरत होते. संपूर्ण ऑपरेशन फक्त २३ मिनिटांत पूर्ण झाले, असे यात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community