Uttarakhand : देवभूमीत १०० हून अधिक अनधिकृत मशिदी 

राज्यातील पछुवा क्षेत्रात अनेक मदरशांचे प्रशस्त इमारतींमध्ये रूपांतर करण्यात आले असून त्यांच्या आवारात मशिदी उभारण्यात येत आहेत.

176
देवभूमीत १०० हून अधिक अनधिकृत मशिदी 
देवभूमीत १०० हून अधिक अनधिकृत मशिदी 

देवभूमीत म्हणून ओळख असलेल्या उत्तराखंड Uttarakhand  राज्यात १०० हून अधिक बेकायदा मशिदी उभारण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे २० सप्टेंबर २००९ या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने ‘कोणत्याही  धार्मिक स्थळाची उभारणी अथवा त्याची दुरुस्ती करण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाची अनुमती घेणे बंधनकारक आहे’, असा आदेश दिला आहे. तथापि हा आदेश धाब्यावर बसवण्यात आल्याचे दिसत आहे.

उत्तराखंड Uttarakhand राज्यातील पछुवा क्षेत्रात अनेक मदरशांचे प्रशस्त इमारतींमध्ये रूपांतर करण्यात आले असून त्यांच्या आवारात मशिदी उभारण्यात येत आहेत. यासाठी शासनाकडून आवश्यक ते नकाशे मंजूर करून घेण्यात आलेले नाहीत. देहरादूनजवळ असलेल्या ‘शिमला बायपास रोड’वर १०० हून अधिक मशिदी शासनाच्या अनुमतीविना उभारण्यात आल्या आहेत. यासाठी सरकारच्या जमिनी बळकावण्यात आल्या आहेत. एक मशीद नदीपात्राजवळ बांधण्यात आली आहे. ही जमीन वन विभागाच्या नदी क्षेत्रातील जमीन आहे. राजधानी देहरादूनहून पोंटासहिब येथे जातांना मुख्य रस्त्यावर सेलाकोई क्षेत्रात कोट्यवधी रुपये खर्चून एका प्रशस्त मदरशाची विनाअनुमती उभारणी केली जात आहे. या मदरशाच्या परिसरात मशीद उभारण्यात येत आहे. अशाच प्रकारे राज्यातील सेलाकोई क्षेत्रातील जमनपूर येथे कोणतीही अनुमती न घेता एक मदरसा आणि मशीद उभारण्यात आली आहे. एवढ्या उंच इमारती उभारण्यात येत असतांना स्थानिक प्रशासन आणि ‘मसुरी देहरादून विकास प्राधिकरण’ याकडे कानाडोळा करत आहेत का ?, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. ‘यामागे राजकीय दबाव आहे का ?’, असा प्रश्‍न स्थानिक विचारत आहेत. एरव्ही सर्वसाधारण नागरिकांच्या घराबाहेर एका विटेच्या बांधकामासाठीही अनुमतीची आवश्यकता असल्याचे सांगितली जात असतांना एवढे मोठमोठे मदरसे, मशिदी आणि मजार शांतपणे कशा काय उभारल्या दिल्या जात आहे ?, हा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

(हेही वाचा The Rationalist Murder : डॉ. दाभोलकर, गौरी लंकेश आदी पुरोगाम्यांच्या हत्यांच्या भरकटलेल्या तपासाचे सत्य उघड करणारे पुस्तक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.