
अखेर प्रतीक्षा संपली असून आज बारावीचा निकाल (HSC Result 2025) जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजेदरम्यान HSC चा निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबतची माहिती दिली आहे. निकालापूर्वी सकाळी बोर्डाची पत्रकार परिषद पार पडेल. (HSC Result 2025)
हेही वाचा-Khalistan Movement : कॅनडामध्ये खलिस्तानी चळवळीच्या अस्ताला सुरुवात
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC/12th) संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. यानुसार 5 मे रोजी दुपारी 1 वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे. निकाल लागल्यानंतर गुणांची पडताळणी, उत्तर पत्रिका मिळण्याबाबत, पूनर्मूल्यांकनासंबंधित माहिती हवी असल्याने अधिकृत संकेतस्थळावरुन अर्ज करता येईल. यासाठी 6 मे ते 20 मे हा कालावधी देण्यात आला आहे. याशिवाय पुढील काही दिवसात म्हणजे 15 मे रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. (HSC Result 2025)
या संकेत स्थळांवर पाहता येईल निकाल : (HSC Result 2025)
https://results.digilocker.gov.in
https://results.targetpublications.org
हेही पहा-
Join Our WhatsApp Community