सामुदायिक शौचालयांची देखभाल कशी राखाल? संस्थांना BMC देणार ज्ञानाचे धडे

419
मेट्रो रेल्वेच्या स्थानक परिसरात भविष्यात पाणी तुंबू नये यासाठी BMC आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांना संयुक्त करावा लागणार अभ्यास
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

मुंबईत मोठ्याप्रमाणात शौचालयांचे बांधकाम सुरु असून वस्ती सहभागातून सामुदायिक शौचालयांची देखभाल संस्थांची नेमणूक करताना संस्थांनी काय काळजी घ्यावी, संस्थांचे कशाप्रकारे सक्षमीकरण केले गेले पाहिजे, संस्थांनी देखभाल व दुरुस्ती कशी राखली गेली पाहिजे यासाठी आता महापालिकेच्यावतीने संस्थासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी ९ ते ५ या वेळेत ही एकदिवशी कार्यशाळा आयोजित करून संस्थांना महापालिका ज्ञानाचे धडे देणार आहे. (BMC)

(हेही वाचा – दहशतवादी हल्ल्यांची मालिका ७५ वर्षांपासूनची; पहलगाम त्याचे विकृत स्वरूप; PM Narendra Modi यांचा हल्लाबोल)

महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यामार्फत वस्ती सहभागातून शौचालयांची देखभाल दुरुस्ती केली जाते. या उपक्रमाची देशभरात दखल घेण्यात आली आहे. या अंतर्गत समावेशक आणि शाश्वत समुदाय स्वच्छतेसाठी ‘समुदाय आधारित संस्था प्रणाली’ सक्षमीकरण या विषयावर बुधवारी २८ मे २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. भायखळा येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात ही कार्यशाळा संपन्‍न होईल. वस्ती पातळीवरील संस्थांना (सीबीओ) प्रशिक्षित व सक्षम बनवणे, हा या कार्यशाळेचा उद्देश आहे. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, संयुक्त राष्ट्रे बालनिधी (युनिसेफ) आणि इतर विकास भागीदार संस्था यांच्या सहयोगाने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. (BMC)

(हेही वाचा – महिला आयोगाच्या अध्यक्षांकडूनच जिवाला धोका? Sangeeta Bhalerao यांची खळबळजनक तक्रार)

या एकदिवशीय कार्यशाळेच्या शुभारंभ प्रसंगी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच वस्ती पातळीवरील संस्था, विकास संस्था, शैक्षणिक संस्था, कॉर्पोरेट क्षेत्र इत्यादींचे प्रतिनिधी कार्यशाळेत सहभागी होणार आहेत. महानगरपालिकेचे ‘वस्ती सहभागातून सामुदायिक शौचालयांची देखभाल-दुरूस्ती’ हे एक देशपातळीवर नावाजलेले प्रारूप आहे. त्याच्या सक्षमीकरणाचे कामकाज मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. या अंतर्गत धोरणात्मक तसेच जनजागृती, वस्ती पातळीवरील संस्थांची क्षमता बांधणी, उद्योजगत विकास, विविध उपक्रमांचे अभिसरण, बहू-भागधारक सहकारी आणि अभिनव संकल्पनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याअंतर्गत शहर स्तरावरील ही एकदिवसीय कार्यशाळा भायखळा (पूर्व) स्थित अण्णा भाऊ साठे नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आली असल्याचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी स्पष्ट केले. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.