गिरणी कामगारांच्या घरासाठी एनटीसीसोबत तातडीने बैठक घ्या; DCM Eknath Shinde यांचे निर्देश

62
मुंबईतील कुर्ला, चांदीवली आणि मिठी नदी परिसरातील झोपडपट्ट्यांना दिलासा; DCM Eknath Shinde यांच्याकडून तातडीने उपाययोजनांचे निर्देश
  • प्रतिनिधी

गिरणी कामगारांनी मुंबईसाठी त्याग केला आहे. त्यामुळे या कामगारांना मुंबईत घरे देण्यास आमचे प्राधान्य आहे. जास्तीत जास्त कामगारांना मुंबईत घरे उपलब्ध करून देण्यासाठी एनटीसीसमवेत तातडीने बैठक घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी शुक्रवारी दिले. याशिवाय शेलू आणि वांगणी येथील घरांच्या किंमती कशा कमी करता येतील यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गिरणी कामगारांना दिले.

गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृह येथे शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी गिरणी कामगारांच्या मागण्या जाणून घेतल्या. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) म्हणाले, गिरणी कामगारांना मुंबईत घर मिळावे ही राज्य सरकारची प्रामाणिक भावना आहे. त्यासाठी मुंबईत किती जागा उपलब्ध होऊ शकते यासाठी एनटीसी सोबत बैठक घेण्यात येणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देत आहोत. मुंबई महानगर प्रदेशात देखील घरे उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आतापर्यंत १५ हजार ८७० घरे गिरणी कामगारांना दिली आहेत. आजपर्यंत सुमारे एक लाख गिरणी कामगार घरासाठी पात्र असून त्यांना घरे उपलब्ध करून देण्यात येतील.

(हेही वाचा – BEST डेपोंच्या पुनर्विकासासाठी धोरण; उत्पन्नवाढीसाठी अत्याधुनिक सुविधांचा आग्रह)

राज्य सरकारच्या माध्यमातून मुंबई महानगर परिसरात विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दळणवळण सुविधांचे जाळे भक्कम करण्यावर भर दिला जात आहे. अशा परिस्थितीत गिरणी कामगारांनी महानगर क्षेत्रात घरांना प्राधान्य द्यावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी गिरणी कामगारांना केले. यावेळी गिरणी कामगार संघटनांच्या काही प्रतिनीधींनी सेलू भागात बांधलेल्या घरांच्या किमती कमी करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

या बैठकीला राज्यमंत्री पंकज भोयर, माजी मंत्री रामदास कदम, आमदार कालीदास कोळंबकर, माजी खासदार राहुल शेवाळे, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्यासह गिरणी कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.