मुंबई : शर्मिष्ठा पानोलीच्या विरोधात तक्रार करणाऱ्या वजाहत खान (Wajahat Khan) याच्या विरोधात हिंदुत्त्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्याने हिंदू देवी – देवतांविरोधात केलेल्या अश्लील पोस्टमुळे त्याच्या अटकेची मागणी देशभर होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी दादर मुंबई येथील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याला लवकरात लवकर अटक करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी त्यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना केली आहे.
(हेही वाचा – Drug Trafficking : बँकॉक मोफत ट्रिपसाठी गांजाची तस्करी; तीन महिलांना अटक)
“वजाहत खान (Wajahat Khan) कादरी याने हिंदू – देवी देवतांविरोधात त्यातूनही भगवान श्रीकृष्ण, देवी कामाख्या यांच्याबद्दल समाजमाध्यमांवर अतिशय अश्लील भाषेत टीका केली आहे. त्याने या पोस्ट करताना कुठल्याही मर्यादा पाळल्या नाही असे दिसत आहे, त्यामुळे सर्व हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. हिंदू निश्चित संतप्त झाले आहेत. त्यामुळे त्याला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी आम्ही करत आहोत” अशा शब्दांत सुनील पवार यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या तक्रारीची दखल घेऊन महाराष्ट्र पोलिसांनी त्या वजाहत खान (Wajahat Khan) याला जिथे असेल तिथून अटक करावी आणि कडक शासन करावे अशी मागणी सुनील पवार यांनी सर्व हिंदुत्त्ववादी संघटनांच्या वतीने ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या माध्यमातून केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community