बांगलादेशातील दिनाजपूरमध्ये भाबेश चंद्र (Bhabesh Chandra) या हिंदु नेत्याचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. भाबेश चंद्र बिरल उपजिल्ह्यातील हिंदूंचे एक प्रमुख नेते होते आणि त्यांनी बांगलादेश पूजा उत्सव परिषदेच्या बिरल शाखेचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले होते. (Hindus In Bangladesh)
१७ एप्रिल या दिवशी २ मोटारसायकलींवर ४ जण आले आणि त्यांनी भाबेश यांचे घरातून अपहरण केले. त्यांनी भाबेश यांना नाराबारी गावात नेले आणि तेथे त्यांना अमानुष मारहाण करून बेशुद्धावस्थेत पुन्हा घरी आणून सोडले. भाबेश यांना तात्काळ रुग्णालयात भरती करण्यात आल्यावर त्यांना तेथे मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती चंद्रा यांच्या पत्नी शांतना रॉय यांनी कळवली.
(हेही वाचा – Umred : आकाशातून कोसळला 50 किलोचा तुकडा; UFO की विमानाचा भाग ?)
बिरल पोलीस ठाण्याचे प्रमुख अधिकारी म्हणाले की, पोलीस या घटनेत सहभागी असलेल्या संशयितांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे काम करत आहेत आणि गुन्हा नोंदवण्याची सिद्धता चालू आहे.
ढाका (Dhaka) येथील मानवाधिकार संघटना ‘ऐन ओ सलीश केंद्र’च्या गेल्या मासातील एका अहवालात असे म्हटले होते की, बांगलादेशात हिंदूंची घरे, मंदिरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठान यांची तोडफोड करण्याच्या एकूण १४७ घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये अनुमाने ४०८ घरांची तोडफोड करण्यात आली, ज्यात ३६ जाळपोळीच्या घटनांचा समावेश आहे. याखेरीज अल्पसंख्यांकांच्या मालकीच्या व्यावसायिक कंपन्यांची तोडफोड करण्याच्या ११३ घटना, तसेच अहमदिया पंथाच्या मशिदींवरील आक्रमणांच्या ३२ घटना घडल्याचे वृत्त आहे. (Bangladesh Violence)
बांगलादेशाने अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करावे ! – भारत
हिंदूंवर होणार्या आक्रमणांविषयी भारताने आधीच बांगलादेशाला सुनावले होते. इतरांवर टीका करण्याऐवजी बांगलादेशाने स्वतःच्या देशातील अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करावे. बांगलादेशात अल्पसंख्यांकांवर अत्याचार करणारे लोक मुक्तपणे फिरत आहेत, ही अत्यंत चिंतेची गोष्ट आहे, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले आहे. (Hindus In Bangladesh)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community