Uttarakhand Landslide : दरड कोसळून महामार्ग बंद ; बद्रीनाथमध्ये हजारो पर्यटक अडकले

पोलिसांनी गौचर, कर्णप्रयाग आणि लंगासूमध्ये बद्रीनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंना खबरदारी म्हणून सुरक्षित ठिकाणी थांबण्यास सांगितलं आहे.

209
Uttarakhand Landslide
Uttarakhand Landslide : दरड कोसळून महामार्ग बंद ; बद्रीनाथमध्ये हजारो पर्यटक अडकले

काही दिवसांपूर्वी खराब वातावरणामुळे चारधाम यात्रा स्थगित करण्यात आली होती. अशातच आता उत्तराखंड (Uttarakhand Landslide) येथील जोशीमठजवळ दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली असून हजारो पर्यटक अडकल्याची माहिती समोर आली आहे.

उत्तराखंडमधील (Uttarakhand Landslide) जोशीमठजवळ गुरुवार ४ मे रोजी दरड कोसळली. यामुळे बद्रीनाथ महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूचे हजारो पर्यटक यामुळे अडकून पडले आहेत. जोशीमठजवळील हेलंग खोऱ्यात एनटीपीसीच्या जलविद्युत प्रकल्पाचं काम सुरू आहे. त्यासाठी जमिनीखाली सुरूंग लावले जात आहेत. अशाच एका सुरुंगामुळे दरड कोसळली असावी, असा अंदाज स्थानिक रहिवासी व्यक्त करत आहेत.

(हेही वाचा – Manipur Violence: मणिपूरमध्ये सरकारचा दंगलखोर दिसताच क्षणी गोळ्या मारण्याचे आदेश; काय आहे हा नेमका वाद?)

या घटनेनंतर प्रशासनाने बद्रीनाथ यात्रेवर स्थगिती आणली आहे. या दरड कोसळीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पोलिसांनी गौचर, कर्णप्रयाग आणि लंगासूमध्ये बद्रीनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंना खबरदारी म्हणून सुरक्षित ठिकाणी थांबण्यास सांगितलं आहे. (Uttarakhand Landslide)

हेही पहा – 

कर्णप्रयागचे सीओ (Uttarakhand Landslide) अमित कुमार म्हणाले, “हेलांगमधील बद्रीनाथ रस्ता सुरू झाल्यानंतर प्रवाशांना दर्शनासाठी जाण्याची परवानगी दिली जाईल. तोपर्यंत कोणालाही या महामार्गावरुन प्रवास करता येणार नाही. सुरक्षेच्या कारणांमुळे वाहतूक पोलिसांकडून देखील प्रवाशांना आवाहन करण्यात येत आहे.”

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.