Meteorological Department: पावसाने दिली हवामान विभागाच्या अंदाजाला हुलकावणी, राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद

अकोल्यात उकाड्यामुळे लोकं हैराण

130
Meteorological Department: पावसाने दिली हवामान विभागाच्या अंदाजाला हुलकावणी, राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद
Meteorological Department: पावसाने दिली हवामान विभागाच्या अंदाजाला हुलकावणी, राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद

राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला जात असला तरीही महाबळेश्वर वगळता पारा सरासरी 30 अंश सेल्सियसवर गेला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात उकाड्यामुळे लोकं हैराण आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी अकोल्यात सर्वाधिक ३६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अमरावती, वर्ध्यात ३५.५ तर यवतमाळमध्ये ३४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईत पारा ३० अंश सेल्सिअसच्या पुढेच आहे. हवामान विभाग मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवीत आहे, तर पाऊस हुलकावणी देताना दिसत आहे. या परिणाम पिकावरही होऊ लागल्याने पिके करपू लागली आहेत.

(हेही वाचा – Maratha Reservation : मनोज जरांगेंची प्रकृती खालावल्याने सलाईन लावून उपचार; वैद्यकीय पथक उपोषणस्थळी दाखल)

बुधवारपासून पाऊस सक्रीय होण्याची शक्यता
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र वायव्य दिशेने पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज, बुधवारपासून राज्यात मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ात बुधवारी दुपारनंतर पावसाचा जोर वाढणार आहे. गुरुवार आणि शुक्रवारी पावसाचा विशेष जोर राहण्याचा अंदाज हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अनुपम कश्यपी यांनी वर्तवला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.