Operation Sindoor नंतर राज्यात हायअलर्ट; मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द

156

Operation Sindoor : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांसाठी नंदनवन असलेल्या पाकिस्तानातील ९ ठिकाणं उद्ध्वस्त केली. भारताने दहशतवाद्यांवर केलेल्या जबरदस्त प्रहाराने मात्र पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. २२ एप्रिलपासून शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय लष्कराच्या तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या मिसाईल्स भारतीय लष्कराने हाणून पाडल्या. त्यानंतर पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्रामध्ये हायअलर्ट (Maharashtra High Alert) जारी करण्यात आला असून, मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. (Operation Sindoor)

(हेही वाचा – Indian Defense : भारतीय शस्त्रास्त्रे अचूक भेदक, मारक; मोदी सरकारची १० वर्षांची आहे ‘ही’ तपस्या)

भारताच्या दहशतवाद्यांवरील कारवाईने पाकिस्तानच बिथरला असून, सीमेपलिकडून अंदाधूंद गोळीबार केला जात आहे. पाकिस्तानी लष्कराकडून सीमेलगत असलेल्या भारतीय गावांवर उखळी तोफा आणि तोफेगोळे डागले जात आहेत. या सर्व प्रकरणांवर भारतीय लष्कराने चोख प्रतीउत्तर देत आहेत. अशातच राज्यात दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील धार्मिक स्थळे, रेल्वे स्थानक आणि विमानतळावर सुरक्षा यंत्रणां वाढवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द (Police leave cancelled) करण्यात आल्या आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.