Hero Xoom 160 : हीरो कंपनीची पहिली मॅक्सी स्कूटर बाजारात

Hero Xoom 160 : हीरो झूम १६० या स्कूटरसह कंपनी प्रिमिअम स्कूटरच्या बाजारपेठेत प्रवेश करत आहे

1836
Hero Xoom 160 : हीरो कंपनीची पहिली मॅक्सी स्कूटर बाजारात
Hero Xoom 160 : हीरो कंपनीची पहिली मॅक्सी स्कूटर बाजारात
  • ऋजुता लुकतुके

हीरो झूम १६० (Hero Xoom 160) ही कंपनीची महत्त्वाकांक्षी स्कूटर आहे. त्यामुळे कंपनीने ती लाँच करताना आणि तिच्या डिझाईनमध्येही कसलीही कसूर ठेवलेली नाही. या स्कूटरसह हीरो कंपनी प्रिमिअम श्रेणीच्या स्कूटर बाजारपेठेत प्रवेश करत आहे. स्कूटरचा लूक मॅक्सी आणि ओडीव्ही प्रकारचा आहे. समोरून स्कूटरच्या हँडलवर एक विंडशिल्ड आहे. या विंडशिल्डच्या खाली दोन मोठे एलईडी दिवे आहेत. आणि या दिव्यांच्या खाली एक मोठा बीक म्हणजे टोकदार धातूची चोचीच्या आकाराची प्लेट आहे. (Hero Xoom 160)

(हेही वाचा- Ather Rizta : एथर एनर्जीची नवीन फॅमिली ई-स्कूटर)

नेहमीच्या स्कूटरच्या तुलनेत हीरो कंपनीने या मॅक्सी स्कूटरला नवीन आणि आधुनिक लुक दिला आहे. हा नवा चेहरामोहरा या स्कूटरची ओळख ठरेल. २०२४ च्या भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये पहिल्यांदा ही स्कूटर लोकांसमोर आली. आणि तेव्हापासून तिची चर्चा नक्की सुरू झाली आहे. हँडलच्या मधोमध असलेल्या डिजिटल क्लस्टरमध्ये ब्लू-टूथ कनेक्टिव्हीटी आणि त्यामाध्यमातून गुगल मॅप बरोबरच इतरही इन्फोटेनमेंट सुविधा आहेत. शिवाय गाडीला चावीची गरज नाही. ऑटो डिजिटल लॉक शक्य आहे. हे ही गाडीचं आणखी एक वैशिष्ट्य ठरावं. (Hero Xoom 160)

आणखी एका बाबतीत ही स्कूटर हीरो कंपनीसाठी महत्त्वाची आहे. या स्कूटरसाठी कंपनीने नवीन लिक्विड कूल इंजिन विकसित केलं आहे. आणि त्याची क्षमता १५६ सीसी इतकी आहे. एक सिलिंडर असलेलं हे इंजिन १४ बीएचपी इतकी शक्ती निर्माण करू शकतं. हीरो कंपनीने भारतात या स्कूटरचं बुकिंग आता सुरू केलं आहे. आणि येत्या काही महिन्यांत ती भारतीय रस्त्यांवर दिसू लागेल. या स्कूटरची स्पर्धा यामाहा एरॉक्स १५५, एप्रिलिया एसआरएक्स १६० (Hero Xoom 160) आणि यामाहा एनमॅक्स १६० (Nmax 160) या स्कूटरशी असेल. (Hero Xoom 160)

(हेही वाचा- Heatstroke: उष्मघाताचे चटके कायम! राज्यात रुग्णसंख्या ७७ वर)

हीरो झूम १६० ची किंमत १ लाख १० हजार रुपयांपासून सुरू होते.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.