लासलगाव सह निफाड तालुक्यात वरुण राजाचे जोरदार आगमन

102
लासलगाव सह निफाड तालुक्यात वरुण राजाचे जोरदार आगमन
लासलगाव सह निफाड तालुक्यात वरुण राजाचे जोरदार आगमन

लासलगाव शहरासह निफाड तालुक्यात शनिवारी, १० जूनला दुपारी तीन वाजेच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह वरुण राजाने जोरदार आगमन केल्याने उष्णतेने व्याकूळ झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. विजेच्या जोरदार कडकडाटसह मुसळधार पावसाने सुमारे एक तास जोरदार हजेरी लावल्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाल्याचे दिसून आले.

लासलगावसह टाकळी पिंपळगाव नजिक, निमगाव वाकडा आदी भागात सुध्दा पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सध्या शेतकरी बांधव खरीप हंगामाची पूर्वतयारी करत आहेत. त्यामध्ये जमिनीची मशागतीची कामे सध्या सुरू आहेत. पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीच्या मशागतीच्या कामांचा वेग वाढणार आहे तसेच बी बियाणे खरेदीला ही मागणी वाढणार आहे.

(हेही वाचा – दादर: उद्यान गणेश मंदिरात अर्पण करता येणार नाही पुष्पहार; मंदिराच्या सेवा समितीने घेतला कठोर निर्णय)

मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून देशासह अनेक राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून लासलगाव शहरात उन्हाच्या काहिलीने नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, शनिवारी झालेल्या जोरदार पावसाने नागरिकांना काही दिलासा मिळणार आहे. देशात मान्सूनचे आगमन मोठ्या दिमाखात झाले असून शेतकऱ्यांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.