Heavy Rain In Himachal Pradesh : पावसाने मागील १२२ वर्षाचा विक्रम मोडला

78
Heavy Rain In Himachal Pradesh : पावसाने मागील १२२ वर्षाचा विक्रम मोडला

देशाच्या अनेक भागात पावसाने दडी मारली आहे. तर काही भागामध्ये पावसामुळे (Heavy Rain In Himachal Pradesh) जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच मुसळधार पावसाने हिमाचल प्रदेशमध्ये मागील १२२ वर्षांचा विक्रम मोडला आहे.

पावसाचा तडाखा आणि भूस्खलनाचे (Heavy Rain In Himachal Pradesh) वाढते प्रकार पाहता हिमाचल सरकारने डोंगर उतारावर असलेल्या धोकादायक इमारतीतील रहिवाशांना अन्यत्र भागात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार कार्यवाही केली जात आहे.

यादरम्यान कुलू जिल्ह्यात अनी भागात आज सकाळी धोकादायक ठरलेल्या डोंगर उतारावर असलेल्या आठ इमारती पाहता पाहता जमीनदोस्त (Heavy Rain In Himachal Pradesh) झाल्या. काही मिनिटात ढासळलेल्या इमारतींमुळे परिसरात धुळ पसरली आणि मातीचे ढिगारे उभे राहिले. सुदैवाने काही दिवसांपूर्वीच या इमारती रिकाम्या केल्याने जीवितहानी झाली नाही.

(हेही वाचा – R Praggnanandhaa : आता जग भारतीय बुद्धिबळपटूंची दखल घेईल – प्रज्ञानंद)

अनी भागातील कोसळलेल्या इमारतीत (Heavy Rain In Himachal Pradesh) दुकाने, बँका आणि अन्य व्यावसायिक प्रतिष्ठानांचा समावेश होता. कुलूच्या नव्या बसस्थानकाजवळील राष्ट्रीय महामार्ग-३०५ जवळ असलेल्या काही इमारतींना भेगा पडल्या होत्या.

त्यामुळे प्रशासनाने नोटिसा बजावून रहिवाशांना अन्य ठिकाणी स्थलांतरित केले होते. आज सकाळी अचानक रिकाम्या इमारतींतून आवाज आला आणि एकानंतर एक अशा आठ इमारती ढासळल्या. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुळ पसरली. अग्निशमन आणि बचाव पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून ढिगारे (Heavy Rain In Himachal Pradesh) बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

शिमल्यात सर्वाधिक पाऊस

शिमल्यात आतापर्यंत २०१७ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. या पावसाने १२२ वर्षाचा विक्रम मोडला आहे. मंडी, सिमला आणि सोलन येथे गेल्या चोवीस तासात चार ठिकाणी ढगफुटी झाली आहे.

एकाच दिवसांत ११ जणांचा मृत्यू झाला असून १८ वाहनांची हानी झाली आहे. शिमल्यातील वाहतूक सुरक्षितेसाठी बंद केली आहे. मुख्यमंत्र्यांकडून संवेदनशील भागात चोवीस तास लक्ष ठेवले जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी हवाई पाहणी केली आणि नुकसानीचे आकलन केले होते.

हिमाचल प्रदेशाने (Heavy Rain In Himachal Pradesh) यंदाच्या मान्सूनमध्ये दोन महिन्यांत तीन दिवस विक्रमी पावसाचा अनुभव घेतला आहे. पहिला पाऊस ९ आणि १० जुलै रोजी मंडी आणि कुलू जिल्ह्यात पडला. त्यानंतर शिमला आणि सोलन जिल्ह्यात १४ ऑगस्ट आणि १५ ऑगस्टला पावसाने विक्रमी हजेरी लावली.

शिमला शहराने मंगळवारी २२ ऑगस्टच्या रात्री मुसळधार पावसाचा मारा सहन केला. शहरात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आणि भूस्खलनाचे प्रकार घडले. या तिन्ही पावसाने हिमाचल प्रदेशची मोठ्या प्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली.

मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू (Heavy Rain In Himachal Pradesh) यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्य सरकारने १६५.२२ कोटी रुपयांचे वाटप केले आहेत. यातील काही पैसा पूल, रस्ते आणि घराच्या डागडुजीसाठी वापरला जात आहे. या पावसामुळे १० हजार कोटींचे नुकसान झाल्याचा त्यांनी दावा केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.