Heavy Rain : पहिल्याच अवकाळी पावसाने मुंबई लोकलला फटका बसला आहे. या पावसाने उपनगरीय मध्य रेल्वेची दाणादाण उडविली आहे. तसेच कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. ठाणे आणि कल्याण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्याने लोकल ट्रेनला ही फटका बसला आहे. कोकणात विलवडे स्थानकादरम्यान रुळांवर दरड कोसळल्याने रेल्वे सेवेलाही फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे कोकणात पुढील ३६ तासांसाठी रेड अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. (Heavy Rain)
(हेही वाचा –Kejriwal Government : दिल्लीत शिक्षण संस्था स्थापन करण्याचे दावे पोकळ?; भाजपने कोणते आरोप केले आहेत ते जाणून घ्या )
नवी मुंबईमध्ये तीन ठिकाणी वृक्ष काेसळले
ठाण्यात मंगळवारी २० मे रोजी सायंकाळी चारनंतर पाऊस कोसळू लागला. मात्र, सहानंतर पावसाचा जोर वाढू लागला. तुफानी पावसाने ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरे आणि त्या परिसरातील ग्रामीण भागाला पावसाने झोडपून काढले आहे. अवकाळी पावसामुळे नवी मुंबईमध्ये तीन ठिकाणी वृक्ष काेसळले आहेत. तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते. शिवाय ठाणे-बेलापूरसह सायन-पनवेल महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड आदी तालुक्यांतही जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. अनेक ठिकाणची वीजही गायब झाली.
कोकण रेल्वेला फटका
जोरदार पावसाने कोकण रेल्वेलाही तडाखा दिला आहे. विशेषत: रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर अधिक होता. मंगळवारी सायंकाळी कोकण रेल्वे मार्गावर वेरवली-विलवडे स्टेशनदरम्यान दरड कोसळली. यामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे गाड्या ठिकठिकाणी थांबून होत्या. दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेसही अडकून पडल्या होत्या. दरम्यान अडीज तासांच्या अथक प्रयत्नांनंतर कोकण रेल्वे पूर्व पदावर आली.
(हेही वाचा – Hindu ग्राहक जागृती अभियानाला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे आशीर्वाद)
अंदाज… इशारा… आणि आवाहन
महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात २१ मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. २४ मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. गुरुवार, २२ ते २४ मेदरम्यान रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघरजवळचा समुद्र खवळण्याचा अंदाज आहे. खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – Cabinet Decision : राज्यात एक लाख कोटीच्या गुंतवणुकीची अपेक्षा; प्रलंबित ३२५ प्रस्तावांना राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी)
घाटकोपर होर्डिंगची पुनरावृत्ती टळली
गेल्या तीन-चार दिवसांपासून पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसत आहे. दरम्यान मंगळवारी २० मे रोजी सायंकाळी सुद्धा पुण्याला जोरदार पावसाने झोडपले. एकाचवेळी 3 ठिकाणी होर्डिंग कोसळले आहेत. या होर्डिंगखाली अनेक वाहने अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. होर्डिंग कोसळल्याच्या दुर्घटनेमुळे पुण्यात प्रचंड वाहतुक कोंडी झाली.
कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून ६ ठार; अनेक जण जखमी
कल्याणच्या तिसगाव रोड वरील चिकनपाडा येथे असलेल्या श्री सप्तशृंगी कॉपरेटिंग हाउसिंग सोसायटी या इमारतीचा स्लॅब कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहे. ही दुर्घटना मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अग्निशमन पथक आणि टी डी एफ पथक आणि कोळसेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, बिल्डिंगचा मलबा उचलण्याचे कार्य सुरू आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community