Heat waves : राज्यात उष्णतेची लाट, बहुतांश ठिकाणी तापमान चाळीशीपार

जळगाव जिल्ह्यात ४४.८ अंश सेल्सिअस तापमान (Heat waves) नोंदवले गेले आहे. तर अकोला येथेही पारा ४४ अंशाच्या पुढे गेला

156
Heat waves : राज्यात उष्णतेची लाट, बहुतांश ठिकाणी तापमान चाळीशीपार

एप्रिल महिन्यात राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्याचा शेती पिकांवर मोठा परिणाम झाला. अशातच आता हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील तापमानाचा पारा (Heat waves) वाढणार आहे. एकीकडे मे महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भात नद्यांना पूर आला आहे तर दुसरीकडे तापमानात पुन्हा वाढ होत आहे.

राज्यातील तापमानाचा पारा (Heat waves) दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढला आहे. आर्द्रतायुक्त आणि गरम हवेमुळे, उष्णतेमुळे अस्वस्थता जाणवणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. (Heat waves)

(हेही वाचा – Heat waves : उष्माघातामुळे जळगाव जिल्ह्यातील एका महिलेचा मृत्यू)

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, देशातील बहुतांश भागात ४० अंशांपेक्षा (Heat waves) जास्त तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रविवार १४ मे रोजी राष्ट्रीय राजधानीसह बहुतांश राज्यांमध्ये हवामानाचे स्वरुप पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता आहे.

हेही पहा –

जळगाव जिल्ह्यात ४४.८ अंश सेल्सिअस तापमान (Heat waves) नोंदवले गेले आहे. तर अकोला येथेही पारा ४४ अंशाच्या पुढे गेला असून, धुळे, परभणी वर्धा येथे तापमान ४३ अंशांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान चाळीशीपार गेले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.