Heat Wave: माणुसकी अजूनही शाबूत; रिक्षाचालकाला त्रास होऊ नये म्हणून महिलेने धरली छत्री

134
सोशल मीडियावर एका सायकल रिक्षावाल्याचा व्हायरल फोटो

असं म्हटलं जातं की लोक आता माणुसकी विसरत चालले आहेत. पण तेव्हा अचानक अशा काही गोष्टी घडतात की आपला माणुसकीवरचा विश्वास पुन्हा दॄढ होतो. सध्या उष्णता प्रचंड वाढलेली आहे. उष्माघाता Heat Wave ची प्रकरणे देखील समोर येत आहेत. अशा परिस्थितीत ज्यांना उन्हामध्ये काम करण्याशिवाय पर्याय नसतो त्या लोकांचं काय होत असेल?

अनेक कष्टकरी या भयानक उष्ण वातावरणात Heat Wave काम करत असतात. त्यांच्या जीवाची पर्वा कोणालाच नसते. सोशल मीडियावर एका सायकल रिक्षावाल्याचा फोटो प्रचंड व्हायरल होतोय. हा फोटो पाहून तुम्हालाही फोटोतील त्या स्त्रीचं कौतुक करावसं वाटेल.

हा फोटो पाहून नेटकरी भलतेच खुश झाले आहेत आणि त्यांनी हा फोटो प्रचंड व्हायरल केला. अनेकांनी फोटोतील या महिलेचे कौतुक केले आहे. कुणाला तिच्यामध्ये माणुसकी दिसली तर कुणाला देव दिसला. हा फोटो तुम्ही पाहू शकता की प्रचंड उन्ह आहे, भयावह असं उष्ण वातावरण आहे. रिक्षावाला रिक्षा चालवतोय आणि मागे बसलेल्या ग्राहक महिलेने त्याच्या डोक्यावर छत्री धरली आहे.

Geeta Shakya या फेसबुक युजरने हा फोटो शेअर केला आणि पाहता पाहता सुगंधासारखा हा फोटो सगळीकडे पसरला. असा कृतीतून जगण्याची एक नवी उमेद जागृत होते, कुणासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते.

(हेही वाचा उष्माघात वाढला; आरोग्य खात्याच्या मार्गदर्शक सूचना)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.