-
प्रतिनिधी
आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या आशासेविका आणि गटप्रवर्तक गेल्या सात महिन्यापासून मानधनापासून वंचित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी एक्स या समाजमाध्यमातून आशासेविका आणि गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मानधनाचा मुद्दा उपस्थित केला. (Health Department)
(हेही वाचा – Bullet Train Virar : बुलेट ट्रेनसाठी विरार स्थानकाच्या कामाला सुरूवात)
समाजाच्या आरोग्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलणाऱ्या आशासेविका आणि गटप्रवर्तकांना गेल्या सात महिन्यांपासून मानधनच मिळालेले नाही. आशासेविका, गटप्रवर्तक या आरोग्यसेवेच्या प्रमुख प्रवाहातील घटक आहेत. या सर्वांचे चरितार्थ त्यांना मिळणाऱ्या मानधनातून चालते. त्यांच्या घरी चूल पेटणार कशी? हा विचार करण्याची संवेदनशीलता सरकारमध्ये राहिली आहे का? वन ट्रिलियन इकॉनॉमींच्या स्वप्नांमध्ये आशा सेविका भगिनींवर अन्याय होतोय, असे पाटील यांनी म्हटले आहे. (Health Department)
(हेही वाचा – महत्त्वाच्या पालिकांसाठी महायुतीचा ‘नो रिस्क’ फॉर्म्युला; BJP स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम)
राज्यभरातील सर्व आशाताईंना न्याय मिळावा यासाठी आम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत. लाडक्या बहिणींच्या लेकरांची उपासमार होऊ नये यासाठी सरकारने रखडलेले मानधन त्वरित द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. (Health Department)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community