कैद्यांपाठोपाठ आता Pakistan च्या तुरुंगातून हेड कॉन्स्टेबलही फरार

74

२ जूनच्या रात्री पाकिस्तानातील (Pakistan) कराची येथील मालीर तुरुंगातून २१६ कैदी पळून गेले. पाकच्या हा भोंगळ प्रशासनाची जगभरात चर्चा होत असतांनाच त्या तुरुंगातील हेड कॉन्स्टेबल राशिद चिंगारी (Head Constable Rashid Chingari) हाही फरार झाला आहे. चिंगारी याच्यावर कैद्यांना पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे.

सिंध सरकारने त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानचे तुरुंगमंत्री अली हसन झरदारी स्वतः या प्रकरणाची चौकशी करत आहेत, असे वृत्त पाकिस्तानी वेबसाइट एआरवाय न्यूजने प्रसिद्ध केले आहे. पळून गेलेल्या २१६ कैद्यांपैकी १२६ कैदी परतले आहेत, तर ९० कैदी अजूनही फरार आहेत.

(हेही वाचा – Pakistani Spy : हिंदू देवतांच्या फोटोआडून पाकिस्तानी करत होते हेरगिरी !)

काही अधिकारी तुरुंगात कैद्यांना मदत करत होते. यामध्ये सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे तुरुंगमंत्र्यांनी म्हटले आहे. राशिद चिंगारीचे नाव आधी निलंबित केलेल्या २३ तुरुंग कर्मचाऱ्यांच्या यादीत नव्हते, परंतु नंतरच्या तपासात त्याचे नाव समोर आले.

तुरुंगातून पळून जाण्याची ही घटना कराचीच्या इतिहासातील सर्वात मोठी सुरक्षा चूक मानली जात आहे. त्यामुळेच तुरुंग विभागाचे आयजी, डीआयजी आणि मालीर तुरुंगाचे अधीक्षक यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

जर एखादा कैदी २४ तासांच्या आत स्वतःहून परतला, तर त्याच्याशी काही प्रमाणात सौम्य वागणूक दिली जाईल, असे सिंध सरकारने म्हटले होते. परंतु जे कैदी परतले नाहीत त्यांना तुरुंग तोडण्याच्या गुन्ह्यासाठी ७ वर्षांची अतिरिक्त शिक्षा दिली जाईल. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तुरुंगात सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Cameras) नसल्याने तपासात अडथळा येत आहे.

याआधीही पाकिस्तानमध्ये (Pakistan) दहशतवादी तुरुंगातून पळून जाण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. २०१२ मध्ये पाकिस्तानच्या बन्नू शहरातील तुरुंगातून ४०० कैदी पळून गेले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.