Hawkers Free Dadar Station :दादर फेरीवाला मुक्त, रेल्वे स्थानक परिसर मोकळा करण्यात पहिल्या दिवशी ७५ टक्के यश

6267
Hawkers Free Dadar Station :दादर फेरीवाला मुक्त, रेल्वे स्थानक परिसर मोकळा करण्यात पहिल्या दिवशी ७५ टक्के यश
Hawkers Free Dadar Station :दादर फेरीवाला मुक्त, रेल्वे स्थानक परिसर मोकळा करण्यात पहिल्या दिवशी ७५ टक्के यश
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 
मुंबई महापालिकेच्या वतीने रस्त्यांवरील पदपथ अतिक्रमण मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या धडक कारवाई महापालिकेने हाती घेतल्यानंतर शनिवारी दादर रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्याचा केविलवाणा  प्रयत्न मुंबई महापालिकेला करता आला. दादर रेल्वे  स्थानकाच्या समोरील केशवसुत उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला आणि रानडे मार्ग, डिसिल्वा रोड,  जावळे मार्ग यावरील फेरीवाल्यांना महापालिकेने हटवल्यानंतरही त्या ठिकाणी पुन्हा फेरीवाले व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत होते. विशेष म्हणजे डिसिल्वा मार्गावर महापालिकेच्या कारवाईची कोणतीही भीती दिसत नव्हती. विशेष म्हणजे रात्री ९ वाजता तीन गाड्या भरून साहित्य  जप्त केल्यानंतरही सुविधा समोर गाड्या उभ्या असतानाही या परिसरातील स्थानकाच्या समोरच फेरीवाल्यांकडून व्यवसाय केला जात होता. (Hawkers Free Dadar Station)
Untitled design 2024 06 30T075311.548
मुंबईकर नागरिकांना पदपथ आणि रस्त्यांचा वापर करताना अडथळा ठरणारे फेरीवाले, पथारीवाले तसेच आरोग्यासाठी अपायकारक अशा पद्धतीने उघड्यावर अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात  महानगरपालिकेमार्फत सातत्याने कारवाई केली जाते. माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमणे यावर अधिक कठोर करावी, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांनी दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त  आयुक्त डॉ. अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन कारवाईला अधिक वेग देण्‍यात आला आहे. (Hawkers Free Dadar Station)
Untitled design 2024 06 30T075445.425
मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांच्या निर्देशानुसार मुंबई फेरीवाल्यांवरील कारवाई शनिवारपासून जोरात सुरुवात करण्यात आली आहे.  बोरिवली, अंधेरी, दादर या भागातील फेरीवाल्यांवर कडक कारवाई करण्यात आली. त्यामुळे  दादर रेल्वे स्थानकाचा परिसर दुपार  पासूनच मोकळा झाला होता आणि यावरून चालताना रहिवाशी आणि रेल्वे प्रवाशी सुखद क्षण अनुभवताना दिसत होते. (Hawkers Free Dadar Station)
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन आणि परवाना विभाग यांच्या वतीने झालेल्या या कारवाईत संपूर्ण दादर स्थानकाच्या परिसर मुक्त करण्यात काही अंशी यश आले होते. कारण महापालिकेची कारवाई करणारी गाडी पुढे निघून गेली की पुन्हा व्यवसाय करण्याचा प्रयत्न फेरीवाल्यांकडून होत होता. केशवसुत उड्डाणपूलाच्या स्थानकाच्या बाजूने फेरीवाल्यांना बसण्यास अटकाव केल्यानंतरही पुन्हा त्या ठिकाणी  फेरीवाले लपत छपत व्यवसाय करत होते.  तर पुलाच्या दुसऱ्या बाजूला रानडे गल्लीपासून ते जावळे मार्गाच्या जंक्शन पर्यंत फेरीवाल्यांकडून बिनधास्त व्यवसाय सुरू होता. प्रत्यक्षात रानडे मार्ग आणि जावळे मार्गावर ही कारवाई तीव्र दिसली. परंतु डिसिल्वा मार्गावर दरबार हॉटेल पासून ते विसावा हॉटेल पर्यंत या कारवाईचा काहीही परिणाम दिसत नव्हता. त्यामुळे डिसिल्वा गल्लीला या कारवाईतून वगळले आहे का असा प्रश्न फेरीवाल्यांना पडला होता. (Hawkers Free Dadar Station)
Untitled design 2024 06 30T075552.533
दरम्यान, फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांचा माल व साहित्य जप्त केलेले तीन ट्रक सुविधा समोरील केशवसुत उड्डाणपुलाच्या शेजारी उभे होते. एका बाजूला सामान जप्त केलेली वाहने उभी असताना उड्डाणपुलाच्या स्थान बाजूने तसेच स्टेशनच्या पायऱ्यांना जोडून व्यवसाय करत होते.त्यामुळे फेरीवाल्यांना महापालिकेच्या कारवाईची भीतीच वाटत नाही, असे दिसून येत होते. मात्र, शनिवारी दादर रेल्वे स्थानक फेरीवाला मुक्त करण्यात परिमंडळ दोन चे उपायुक्त प्रशांत सपकाळे यांच्या देखरेखीखाली  जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त अजित आंबी  यांच्या टीम ला ७५ टक्के यश आल्याचे पाहायला मिळाले. (Hawkers Free Dadar Station)
Untitled design 2024 06 30T075625.582
रस्ते, पदपथांवर फेरीवाल्यांची संख्या वाढून अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी महानगरपालिका (Municipal Corporation) प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत.या तक्रारींची दखल घेत जी उत्तर विभागाच्या वतीने शनिवारी २९ जून २०२४) दिवसभर दादर रेल्वे स्थानक (पश्चिम) परिसरात अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. सेनापती बापट मार्ग, रानडे मार्ग, डी’सिल्वा मार्ग या रस्त्यांवर अतिक्रमण निर्मूलन कारवाई करत अनधिकृत फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मोहीम सुरु राहणार असल्याचे सहायक आयुक्त (जी उत्तर) अजितकुमार आंबी (Ajit Kumar Amb) यांनी म्हटले आहे. (Hawkers Free Dadar Station)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.