Hawkers Action : फेरीवाल्यांवरील कारवाईची मोहिम फसवण्याचा महापालिकेच्या पथकांचा असाही डाव?

3034
Hawker Policy : लवकरच टाऊन वेंडींग कमिटीवरील सदस्य निवडीकरता निवडणूक

मुंबईतील पदपथ अतिक्रमण आणि फेरीवाला मुक्त करण्याच्या निर्धार जाहीर करत महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सर्व सहायक आयुक्तांसह अतिक्रमण विभागाला कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर शुक्रवारी काही भागांमध्ये कारवाई करण्यात आली. येत्या शनिवारपासून ही कारवाई अधिक तीव्र होणार असून ही कारवाई कशाप्रकारे रोखता येईल यासाठी परवाना विभागाचे अधिकारी आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी करताना दिसत आहेत. त्यामुळे शुक्रवारीच महापालिकेच्या पथकांनी जाणीवपूर्वक मराठी माणसांच्या व्यवसायांवर कारवाई करून रेल्वे स्थानकांपासून दीडशे मीटर परिसरातील फेरीवाल्यांना अभय देण्याचे काम केले. त्यामुळे महापालिकेला ही कारवाई यशस्वी करायची आहे की फेरीवाल्यांचा रोष वाढवून महापालिकेच्या कारवाईत अडथळा निर्माण करायचा आहे असा सवाल उपस्थित होत आहे. (Hawkers Action)

पदपथांवरील अतिक्रमणे, अनधिकृत फेरीवाले यामुळे सर्व सामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे निरीक्षण माननीय उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. अतिक्रमण निर्मुलन करताना अधिक परिणामकारकता आणि सातत्य ठेवावे लागणार आहे. केवळ दिवसाच नव्हे तर रात्रीच्या कालावधीत तसेच शनिवार व रविवारही नियमितपणे कारवाई केली पाहिजे, अशाप्रकारचे निर्देश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी गुरुवारी झालेल्या संयुक्त बैठकीत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह सहआयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्तांसह अधिकाऱ्यांना दिले आहेत. या बैठकीनंतर शुक्रवारी महापालिकेच्या परवाना विभागाच्यावतीने प्रत्येक विभागातील कारवाईची जबाबदारी निश्चित करण्यासाठी प्रत्येक परवाना निरिक्षकांची यादी तयार केली. या परवाना निरिक्षकांच्या माध्यमातून शनिवारपासून ही कारवाई अधिक तीव्र केली जाण्याची शक्यता आहे. महापालिकेने पहिल्या टप्प्यात १७ ते १८ रेल्वे स्थानकांसह काही ठिकाणे निश्चित केली असून यासर्व ठिकाणांना प्रथम टार्गेट केले जाणार आहे. (Hawkers Action)

New Project 2024 06 28T200109.650

(हेही वाचा – Maharashtra Budget 2024: “हा थापांचा नाही, तर मायबापांचा अर्थसंकल्प”; फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रतिउत्तर)

या भागांत केली कारवाई 

दरम्यान, शुक्रवारी महापालिकेच्या विभागीय कार्यालयांच्या अतिक्रमण निर्मुलन विभागासह परवाना विभागाच्या पथकांनी काही ठिकाणी कारवाई केली. यामध्ये दादर भागात केवळ रानडे मार्गावरील सुविधा ते सिंग्नल या भागांमधील फेरीवाल्यांवरील कारवाई वगळता उर्वरीत रेल्वे स्थानकाशेजारी भाग, केशवरसुत उड्डाणपुलाखालील गाळे, डिसिल्व्हा रोड, जावळे मार्गावरील फेरीवाल्यांचा व्यवसाय सुरुच होता. असाच प्रकार बोरीवली, अंधेरी, घाटकोपरमध्ये दिसून आला. न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास अटकाव केला जावा अशाप्रकारच्या सुचना असताना महापालिकेचे अधिकारी त्यांच्यावर कारवाई करत नाहीत आणि कारवाई दाखवण्यासाठी मग कोणत्याही एका महत्वाच्या रस्त्यावरील फेरीवाल्यांना हटवून कारवाई केली जात असल्याचे चित्र निर्माण करतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. (Hawkers Action)

महापालिकेने जर कारवाई हाती घेतली आहे तर आधी रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर तरी साफ करा आणि मग इतर ठिकाणांवरील फेरीवाल्यांवर कारवाई करा. परंतु तसे न करता अधिकारी जाणीवपूर्वक काही मराठी तसेच स्थानिक फेरीवाल्यांवर कारवाई करतात, जेणेकरून हे फेरीवाले महापालिकेविरोधात आक्रमक होतील आणि ही कारवाई थांबली जाईल,असा यामागचा हेतू असल्याचे रहिवाशांकडून बोलले जात आहे. त्यामुळे फेरीवाल्यांवरील कारवाई रेल्वे स्थानकापासून सुरु करून पुढेपर्यंत केली जावी असे रहिवाशांचे म्हणणे आहे. परंतु रेल्वे स्थानकावरील फेरीवाल्यांना अभय देवुन जिथे लोकांना काही त्रास होत नाही त्यांच्यावर कारवाई करून या चांगल्या मोहिमेची वाट लावू नये,असेच लोकांचे म्हणणे आहे. (Hawkers Action)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.