Harbour AC Local : ऐन उन्हाच्या तडाख्यात मुंबईकरांचा प्रवास आता गारेगार होणार आहे. मुंबईकरांना हार्बर मार्गावरून पुन्हा गारेगार प्रवास करता येणार आहे. मध्य रेल्वेने चेन्नईवरून आलेली लोकल पुन्हा हार्बर मार्गावर सुरू करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच 14 फेऱ्या चालवण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये ७ अप आणि ७ डाउन फेऱ्यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना गारेगार आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे. (Harbour AC Local :)
(हेही वाचा – Murshidabad Violence वर तात्काळ सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार)
एसी लोकल पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), वाशी ते वडाळा आणि वडाळा ते पनवेल या मार्गांवर धावणार आहे. हार्बर मार्गावर एसी लोकल सुरू झाल्याने प्रवाशांना फायदा होणार आहे. नॉन-एसी लोकलमधील (Non-AC Local) गर्दी कमी होणार आहे. तसेच ऐन उन्हाळ्यात गारेगार आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे.
पहिली एसी लोकल
देशातील पहिली वातानुकूलित लोकल पश्चिम रेल्वेवर डिसेंबर २०१७ मध्ये धावली. त्यानंतर मध्य रेल्वेने जानेवारी २०२० रोजी ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे – पनवेल दरम्यान पहिली वातानुकूलित लोकल सुरू केली. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर डिसेंबर २०२० पासून सीएसएमटी – कल्याण मार्गावर दुसरी वातानुकूलित लोकल चालविण्यास सुरूवात केली. अल्प प्रतिसादामुळे ट्रान्स हार्बवरील वातानुकूलित लोकल बंद करण्यात आली.
(हेही वाचा – JD Vance India Visit : अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींचा सहकुटुंब भारत दौरा; मंदिरात दर्शन, पंतप्रधानांनी मुलांना दिली ‘ही’ भेट)
हार्बर मार्गावर जानेवारी २०२२ मध्ये सीएसएमटी – वाशी/ पनवेल आणि सीएसएमटी – वांद्रे / गोरेगावदरम्यान वातानुकूलित लोकल सुरू करण्यात आली. परंतु, सामान्य लोकल सेवा बंद करून वातानुकूलित लोकल सुरू केल्याने, या मार्गावरील वातानुकूलित लोकलला प्रतिसाद कमी मिळू शकला नाही. प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे सीएसएमटी – पनवेल, गोरेगाव हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकल (AC Local) सेवा मे २०२२ पासून बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. हार्बर मार्गावरील वातानुकूलित फेऱ्यांऐवजी सामान्य लोकलच्या फेऱ्या चालविण्यास सुरुवात केली. तर, हार्बर मार्गावरील वातानुकूलित फेऱ्या बंद करून त्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर वळवण्यात आल्या.
(हेही वाचा – बाबा सिद्दिकींप्रमाणेच तुला…; माजी आमदार Zeeshan Siddique यांना ठार मारण्याची धमकी)
सुट्टीच्या दिवशी सामान्य लोकल फेऱ्या
हार्बर मार्गावर सोमवार – शनिवारदरम्यान वातानुकूलित लोकल फेऱ्या धावतील. तर, रविवारी आणि सरकारी सुट्टीच्या दिवशी वातानुकूलित ऐवजी सामान्य लोकल फेऱ्या धावतील. हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल चालवण्याचे नियोजन आहे. नुकताच मध्य रेल्वेच्या ताफ्यात एक वातानुकूलित लोकल दाखल झाली असून, त्याचा वापर हार्बर मार्गावर केला जाईल. अशी माहिती मध्य रेल्वे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, डॉ. स्वप्निल निला यांनी दिली.
मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय मार्गावर १,८१० लोकल फेऱ्यांमधून सुमारे ३९ लाख प्रवासी प्रवास करतात. तर, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरून दरररोज ६६ वातानुकूलित लोकलमधून ७८ हजार प्रवासी प्रवास करतात. नुकताच या मार्गावर १४ वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढविण्यात आल्या असून आता या मार्गावर एकूण ८० वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्यात येत आहेत. दरम्यान चेन्नईमधील इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून (आयसीएफ) वातानुकूलित लोकल मुंबईत दाखल झाली आहे. त्याची चाचणीअंती ही लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात येणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community