हलाल सर्टिफिकेटला फायदा; हिंदूंना मात्र कायदा ?; Solapur येथील घटनेची अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्याकडून पोलखोल

Solapur : कायदे बनतांना ते हिंदूंसाठी बनायला हवे होते; पण तसे झाले नाही, असे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी म्हटले आहे.

122

सोलापूरच्या (Solapur) काही युवकांचा एक फोटो व्हायरल होत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) काही युवक हातात फलक घेऊन उभे होते. ‘त्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या, तर तुम्ही धर्म विचारून खरेदी तरी करा. जात नाही, तर धर्म विचारला’, असे या फलकांवर लिहिले होते. यानंतर पोलिसांनी या युवकांवर कारवाई केली. या घटनेविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

(हेही वाचा – INDI Alliance : इंडी आघाडीकडून देशविरोधी वक्तव्ये, भाजपने घेतला विरोधकांचा खरपूस समाचार)

हिंदूंना कशा प्रकारे दुटप्पी वागणूक दिली जाते, याची पोलखोल हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केली आहे. वीरेंद्र इचलकरंजीकर (Virendra Ichalkaranjikar) म्हणाले, “सोलापूर येथील घटनेत गुन्हा नोंद कोणी केला, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात चॅप्टर केस दाखल झालेली आहे. चॅप्टर केसमध्ये ‘असे पुन्हा करणार नाही’, असे बंधपत्र लिहून घेतले जाते. कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून पोलिसांनी ही कारवाई केली असेल, तर युवकांनी फलक हातात घेतल्यामुळे कोणता धर्म कायदा-सुव्यवस्था धोक्यात येणार, हे पोलिसांना स्पष्ट असेल. सोलापूर एसपी, गृहमंत्री यांनी यात लक्ष घातले आहे.

असे फलक हातात धरणे संविधानाच्या (Constitution of India) चौकटीत बसते का, याचा विचार करतांना लक्षात घ्यावे लागेल की, देशाची फाळणीच धर्माच्या आधारावर झाली आहे. त्या वेळी पाकिस्तानातील हिंदूंनी भारतात यावे आणि भारतातील मुसलमानांनी पाकिस्तानात जावे, असे आवाहन केले जात होते. त्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही या आवाहनाला पाठिंबा दिला होता. त्यांच्या ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ (Thoughts on Pakistan), या पुस्तकात त्याचे दाखले आढळतात.

दोन कलमांमधील सूक्ष्म भेद

अशा परिस्थितीत तेव्हा कायदे बनतांना ते हिंदूंसाठी बनायला हवे होते; पण तसे झाले नाही. संविधानाच्या कलम १५-१६ नुसार धर्माच्या आधारावर दोन समाजात भेद निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. धर्म, जाती, वंश, भाषा यांना धरून आवाहन करू नका, असे म्हटले आहे. असे असले, तरी कायदा एक असतो आणि परिस्थिती वेगळी असते. वक्फ बोर्डावर सरकारचे नियंत्रण येताना दिसत नाही.

हलाल अर्थव्यवस्था म्हणजे एकप्रकारे ‘मुसलमानांनी मुसलमानांकडून खरेदी करा’, असे म्हणणे आहे. त्यावर कारवाई होत नाही; कारण संविधानाच्या कलम २५ नुसार प्रत्येक धर्माला धार्मिक स्वातंत्र्य आहे. कलम १५-१६ आणि कलम २५ मध्ये सूक्ष्म भेद आहे. त्यामुळे हलाल सर्टिफिकेटला फायदा आणि हिंदूंना कायदा, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

हा एका घटनेचा मुद्दा नाही. पहलगाम येथील घटनेनंतर सोलापुरातील तरुणांनी केलेली कृती ही त्यांची रिअॅक्शन होती. व्यापक जनजागृतीतून अशी आवाहने सफल होतील, असे ते म्हणाले.

ओम प्रतिष्ठान सोलापूरच्या युवकांच्या पाठीशी – मंजिरी मराठे

हिंदूंना शुद्ध प्रसाद मिळावा, यासाठी ओम प्रतिष्ठानकडून ‘ओम प्रमाणपत्रा’चे वितरण केले जाते. ओम प्रतिष्ठान (Om Pratishthan) या तरुणांच्या पाठीशी खंबीर उभे आहे, असे प्रतिष्ठानच्या संयोजक मंजिरी मराठे यांनी सांगितले. (Solapur)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.