-
मुंबई (सचिन धानजी)
पावसाळी पाण्याचा निचरा जलद गतीने करण्यासाठी हाजी अली पर्जन्य जलवाहिनी पंपिंग स्टेशन बनवण्यात आल्यानंतर याच्या दैनंदिन देखभालीसाठी नियुक्त केलेल्या कंपनीचा कालावधीत येत्या ३१ मे २०२५ रोजी संपुष्टात येत आहे. यामुळे आता पुढील १५ वर्षांसाठी देखभालीसाठी नवीन कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येत असून या देखभालीवर तब्बल २७८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
मुंबई महापालिके ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत तसेच चितळे समितीच्या अहवालानुसार मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाळी पाण्याचा जलदगतीने निचरा व्हावा यासाठी सहा पंपिंग स्टेशन बांधण्याचा निर्णय घेत, याअंतर्गत हाजी अली (महालक्ष्मी) पंपिंग स्टेशनचे बांधकाम करून सन २००९-१०मध्ये सुरु करण्यात आले आणि एक वर्षांच्या हमी कालावधीनंतर सन २०११ पासून सन २०१८मध्ये या पंपिंग स्टेशनच्या देखभालीसाठी युनिटी कंस्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली होती.
(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : भारताने युरोपियन महासंघाला खडसावलं, म्हणाले…)
या देखभाल आणि दुरुस्तीसाठी २०१८पासून सात वर्षांच्या कालावधीसाठी नेमलेल्या म्हाळसा कस्ट्रक्शन कंपनी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. ही मुदत आता ३१ मे २०२५ ही रोजी संपुष्टात येत आहे.
त्यामुळे आता महापालिकेच्यावतीने (BMC) पुढील १५ वर्षांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून या निविदेमध्ये डब्ल्यूएमईएल-एएनसी जेव्ही या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या १५ वर्षांच्या देखभालीसाठी तब्बल २७८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.
महापालिकेच्या (BMC) अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सल्लागारांनी हाजी अली आणि इर्ला पंपिंग स्टेशनच्या (Irla Pumping Station) उपकरणांची वस्तुस्थितीचा मुल्यांकन माहिती करण्यासाठी पूर्व तपासणी केली व अहवाल बनवला आणि ते अहवाल आयआयटी (IIT) कडून खात्री करून घेतला. त्याने कोणकोणते उपकरण पूर्ण बदलणे गरजेचे होते व कोणकोणते उपकरण फक्त दुरुस्त करणे गरजेचे होते याची माहिती प्राप्त करून घेत ही निविदा निमंत्रित करून कंत्राटदाराची नेमणूक केल्याचे स्पष्ट केले.
महापालिकेने हाजी अली पंपिंग स्टेशन (Haji Ali Pumping Station) करता सन २००९मध्ये पंप खरेदी करून ते हे पंपिंग स्टेशन हे सन २०१०मध्ये कार्यान्वित केले होते. तब्बल ९९ कोटी रुपये खर्च करून हे पंपिंग स्टेशन बनवण्यात आले होते, त्यात पुढील सात वर्षांच्या देखभालीचाही समावेश होता. त्यानंतर पुढील आठ वर्षांच्या देखभालीसाठी सुमारे ४४ कोटी रुपये खर्च करण्यात येत होते, परंतु आता येथील पंप खराब झाल्यामुळे तसेच त्यांचे आयुर्मान संपल्यामुळे हे पंप नव्याने बसवून त्यांची पुढील १५ वर्षांसाठी नेमणूक करण्यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. केवळ देखभाल आण दुरुस्ती नव्हेतर यामध्ये नवीन पंप आणि इतर उपकरणे तसेच सिव्हील प्रकारची कामेही प्रस्तावित असल्याचे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community