महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातच आता महागाईमुळे सलून व ब्युटीपार्लर व्यवसायाची 30 ते 50 टक्के दरवाढ होणार आहे. 1 मे पासून हे दर लागू होणार आहेत.
बैठकीत झाला निर्णय
सलूनच्या दरांमध्ये वाढ करण्यासंदर्भात सोमवारी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. सलून चालकांच्या झालेल्या या बैठकीत दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई सलून ब्युटीपार्लर कामगार युनियनचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी सांगितले की, इंधन, घरगुती गॅस सिलिंडर, खाद्यतेलासह सौंदर्यप्रसाधनांच्या दरांतही वाढ करण्यात आली आहे.
( हेही वाचा: सामान्यांच्या जीवाला महागड्या औषधांचा घोर )
…म्हणून दरवाढीचा निर्णय
सोमवारी सलून मालकांच्या झालेल्या बैठकीत वाढत्या महागाईमुळे वाढलेला कौटुंबिक आणि व्यावसायिक खर्च तसेच, सलूनच्या गाळ्याचे भाडे याचा योग्य तो ताळमेळ बसवण्यासाठी दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या सलूनमध्ये एसी आहे अशा सलूनचे दर 1 मेपासून 50 टक्के वाढणार आहेत. तसेच, साध्या सलूनमध्ये 30 टक्के भाववाढ जाहीर करण्यात आली आहे.