Gyanvapi Case : ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा करण्याची न्यायालयाची परवानगी; हिंदू पक्षाला मिळाले मोठे यश

Gyanvapi Case : ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार हिंदू पक्षाला देण्यात आला आहे. न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला 7 दिवसांच्या आत बॅरिकेटिंगची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. ते मशिदीच्या खाली आहे.

244
Gyanvapi Case : ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा करण्याची न्यायालयाची परवानगी; हिंदू पक्षाला मिळाले मोठे यश
Gyanvapi Case : ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा करण्याची न्यायालयाची परवानगी; हिंदू पक्षाला मिळाले मोठे यश

वाराणसी न्यायालयाने (Varanasi Courts) ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार दिला आहे. ३१ जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीत वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने हिंदू पक्षाच्या बाजूने मोठा निर्णय दिला. ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार हिंदू पक्षाला देण्यात आला आहे. (Gyanvapi Case)

(हेही वाचा – Prashant Kishor : राहुल गांधींच्या यात्रेची वेळ चुकीची; प्रशांत किशोर यांची परखड टीका)

ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार हिंदू पक्षाला देण्यात आला आहे. न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला 7 दिवसांच्या आत बॅरिकेटिंगची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. ते मशिदीच्या खाली आहे.

काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्ट विधी करणार

आता येथे नियमित पूजा होईल. काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्ट (Kashi Vishwanath Temple Trust) विधी पार पाडणार आहे. हिंदू पक्षाने याला मोठा विजय म्हटले आहे आणि 30 वर्षांनंतर आपल्याला न्याय मिळाला, अशी भावना व्यक्त केली आहे. नोव्हेंबर 1993 पर्यंत येथे पूजा होत असे. वाराणसीच्या (Varanasi) ज्ञानवापी संकुलातील व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार मिळावा, या शैलेंद्रकुमार पाठक यांच्या याचिकेवर ३० जानेवारीला सुनावणी केल्यानंतर जिल्हा न्यायाधीशांनी आदेश राखून ठेवला होता. ज्याचा निर्णय ३१ जानेवारी रोजी झाला आहे.

(हेही वाचा – Ind vs Eng 2nd Test : राहुल, जडेजाच्या दुखापतीमुळे भारतीय संघासमोर संघ निवडीचा प्रश्न)

मुस्लिम बाजूची याचिका फेटाळली

या प्रकरणात नोव्हेंबर 1993 पूर्वी व्यास तळघरात पूजा केली जात होती. ती पूजा तत्कालीन राज्य सरकारने थांबवली होती. ती पुन्हा सुरु करण्याचा अधिकार दिला गेला पाहिजे, अशी भूमिका हिंदू बाजूने मांडली. त्याच वेळी मुस्लिम बाजूने पूजा स्थळ कायद्याचा (places of worship act 1991) हवाला देत याचिका फेटाळण्याची मागणी केली होती. न्यायालयाने मुस्लिम बाजूची याचिका फेटाळली आणि हिंदूंना ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार दिला. (Gyanvapi Case)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.