Competitive Exams : युपीएससी, एमपीएससी, सीडीएस आणि एनडीए स्पर्धा परीक्षांवर महेश कुलकर्णींकडून मार्गदर्शन 

26

८ जून २०२५ या दिवशी कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई द्वारे चेंबूर येथे स्पर्धा परीक्षा (Competitive Exams) मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात आला होता. यावेळी  स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या सावरकर आय्एएस् स्टडी सर्कलचे संचालक महेश कुलकर्णी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षांविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष अनिल नवगणे, माजी नगरसेवक महादेव शिवगणे, कार्यकारिणी सदस्य भास्कर चव्हाण आणि बाळकृष्ण पुजारे आदी उपस्थित होते. यावेळी महेश कुलकर्णी हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
वायू दल, नौदल, भूदल येथे अधिकारी म्हणून कार्यरत होण्यासाठी एनडीए, सीडीएस अशा परीक्षा (Competitive Exams) द्याव्या लागतात. प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी युपीएससी, एमपीएससी राज्यसेवा परीक्षा द्याव्या लागतात. या सर्व परीक्षांचे (Competitive Exams) स्वरूप काय असते, पात्रता निकष काय असतात इत्यादी संबंधी माहिती या वर्गात देण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या सावरकर आय्एएस् स्टडी सर्कलचे संचालक महेश कुलकर्णी यांनी येथे माहिती दिली, तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली. डॉ. रुचिता बोलाडे यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले, तर या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी भास्कर चव्हाण आणि त्यांच्या सहकारी वर्गाने उत्तम प्रयत्न केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.