GST : महाराष्ट्र शासनाचा लाखो रुपयांचा जीएसटी कर बुडत असल्याबाबत तक्रार दाखल

272
GST : वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा उच्चांक; तीन लक्ष कोटींचा टप्पा पार
GST : वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा उच्चांक; तीन लक्ष कोटींचा टप्पा पार

मंत्रालयाच्या हाकेच्या अंतरावरच असलेल्या व सचिवालय जिमखाना कंपाऊंडच्या आतमध्ये मागील बाजूस मे. अराहा हाॅस्पिटॅलिटी प्रा. लि. /मे मिरची तडका या नावाने सचिवालय जिमखाना येथे उपहारगृह आहे. या उपहारगृहात काउंटरवर काम करीत असलेले चंद्रशेखर यांनी गुरूवार, २२ जून २०२३ रोजी दुपारी जेवल्यानंतर रुपये २४४/- चे कच्चे बिल दिले. या बिलावर अनुक्रमांक नाही, जीएसटी नंबर नाही, हे पडताळून पाहिले असता लक्षात आले की पक्के बिल देण्यात यावे, तसे चंद्रशेखर यांच्याकडे मागणी केली असता, त्यांनी हेच बिल आम्ही आलेल्या लोकांना देतो, असे सांगितले. याबाबत वसंत उटीकर यांनी तक्रार दाखल केली आहे.

या बिलावर अनुक्रमांक व जीएसटी नंबर नसल्याचे आढळून आल्याने, सदर व्यापारी हा महाराष्ट्र शासनाचा १८ टक्के जीएसटी कर हा भरत नाही तथा बुडवत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा लाखो रुपयांचा जीएसटी कर बुडत असून महसूल हानी होत आहे. त्यामुळे सदर प्रकरणात व्यापा-यावर कायदेशीर कारवाई व्हावी, म्हणून महाराष्ट्र शासनाकडे व राज्यकर आयुक्त यांच्या कडे रीतसर तक्रार २२ जून २०२३ च्या पत्रान्वये दाखल केलेली आहे, असे वसंत उटीकर यांनी सांगितले.

(हेही वाचा Uddhav Thackeray: हिंदुत्वाला लाथाडून उद्धव ठाकरेंची पाटण्यात हजेरी – उदय सामंतांचा हल्लाबोल )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.