Greta Thunberg यांचा प्रसिद्धीचा स्टंट; या वेळी आला दहशतवाद्यांच्या समर्थकांचा पुळका

एका इस्त्रायली अधिकाऱ्याने या मिशनला 'सेल्फी फ्लोटिला' म्हटले. हे जहाज इस्रायलने ताब्यात घेतले, Greta Thunberg लाही ताब्यात घेतले. आता इस्रायलने ग्रेटाला एका विमानाद्वारे स्वीडनला तिच्या मायदेशी पाठवले आहे.

60
सायली डिंगरे – लुकतुके
इस्रायल आणि हमासमधील युद्धात गाझापट्टी हा परिसर युद्धभूमी बनला आहे. पाकव्याप्त काश्मीर ही जशी भारताची दुखरी बाजू आहे. तशीच गाझापट्टी ही इस्रायलची दुखरी नस आहे. (Israeli–Palestinian conflict) तो मुळात इस्रायलचा भूभाग आहे, पॅलेस्टाईनने त्या भूभागाला आतंकवाद्यांचे लाँचपॅड बनवून इस्रायलच्या कुरापती काढल्या आहेत. ७ ऑक्टोबर २०२३ च्या रात्री हमासने इस्रायलवर केलेल्या आतंकवादी हल्ल्यात शेकडो नागरिकांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर आतंकवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या या गाझाचा समूळ इलाज इस्रायल करत आहे. अशा स्थितीत आतंकवाद्यांच्या समर्थकांची रसद बंद थांबवली; म्हणून आता मानवतावाद्यांना पुळका येत आहे. स्वतःला पर्यावरणाची रक्षक समजणारी ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg) हिनेही अशीच स्टंटबाजी केली आहे.
(हेही वाचा – Ahmedabad Plane Crash : एअर इंडियाच्या दुर्घटनेनंतर टाटा समूहाकडून पोस्ट; संवेदना व्यक्त करत अध्यक्ष म्हणाले…)

ती एका बोटीतून गाझामधील (Gaza) तथाकथित पीडितांसाठी अन्न आणि औषधे घेऊन जात होती. ग्रेटा आणि इतर ११ कार्यकर्त्यांना घेऊन जाणारी ‘मॅडलिन’ बोट इस्त्रायली सैन्याने वाटेतच थांबवली. या बोटीवर ब्रिटिश झेंडा होता आणि ती ‘फ्रीडम फ्लोटिला’ (Freedom Flotilla) युतीचा भाग होती. या मिशनचा उद्देश गाझामध्ये मदत पोहोचवणे हा होता. एका इस्त्रायली अधिकाऱ्याने या मिशनला ‘सेल्फी फ्लोटिला’ म्हटले. हे जहाज इस्रायलने ताब्यात घेतले, ग्रेटालाही ताब्यात घेतले. आता इस्रायलने ग्रेटाला एका विमानाद्वारे स्वीडनला तिच्या मायदेशी पाठवले आहे.

पूर्वी ग्रेटा हवामान बदलावर भाषणे देत होती. विविध देशांच्या सरकारला प्रश्न विचारत होती. आता ती ‘फ्री पॅलेस्टाईन’ (Free Palestine) चळवळीत सामील झाली आहे. पॅलेस्टिनी स्कार्फ (केफियाह) घालून निदर्शने करताना दिसते. मदतकार्याच्या वेळीही ग्रेटाला चांगलेच माहीत होते की, गाझा दौरा त्यांना जगभरात प्रसिद्धी आणि सहानुभूती मिळवून देऊ शकतो. जेव्हा इस्त्रायली सैन्याने तिची बोट थांबवली, तेव्हा ग्रेटाने एक आधीच रेकॉर्ड केलेला व्हिडिओ तात्काळ सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला.

ग्रेटा यांचा हा प्रसिद्धीसाठीचाच डाव होता, असे म्हणण्यास अजूनही वाव आहे; कारण त्यांच्या संपूर्ण बोटीत जी मदत सामग्री होती, ती एका ट्रकपेक्षाही कमी होती. गेल्या दोन आठवड्यांतच इस्त्रायलने गाझामध्ये सुमारे १२०० मदत ट्रक पाठवले आहेत. इस्रायलने ताब्यात घेतल्यानंतरही ग्रेटाने आपले नाटक सुरूच ठेवले. त्यांनी आपल्या समर्थकांना स्वीडिश सरकारवर दबाव आणण्यास सांगितले, जेणेकरून त्यांना सोडवले जाईल. त्यांनी असाही दावा केला की, त्यांच्या बोटीवर काही उत्तेजक पदार्थ फवारण्यात आला होता. या संपूर्ण मोहिमेत गाझाच्या खऱ्या संकटापेक्षा ग्रेटाच्या कॅमेऱ्यासमोरच्या उपस्थितीवर अधिक लक्ष केंद्रित केले होते.

मदतीचे तर कारण होते, प्रत्यक्षात आतापर्यंतच्या अनेक उदाहरणांतून असे दिसून आले आहे की, ग्रेटा या जागतिक चर्चेच्या विषयांचा केवळ प्रसिद्धीसाठी वापर करतात.

‘ग्रीन एनर्जी’ बोट आणि कार्बन उत्सर्जनाचे दावे फोल

ग्रेटा विमान प्रवासापासून दूर रहाते जेणेकरून कार्बन उत्सर्जन कमी होईल, म्हणूनच ती बोट आणि इलेक्ट्रिक कारचा वापर करते. एकदा न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र हवामान परिषदेत सहभाग घेण्यासाठी जातांना ग्रेटाने ‘मालिजिया’ (racing yacht Malizia II) नावाच्या रेसिंग बोटीने अटलांटिक महासागर पार केला, ज्याला ‘झिरो कार्बन’ असे म्हटले गेले. या वेळी सत्य हे होते की, बोट पूर्णपणे पर्यावरणपूरक नव्हती. ती चालवण्यासाठी साहाय्यक जहाजे वापरली गेली, जी जीवाश्म इंधनावर चालत होती. ती बोट परत आणण्यासाठी चालक दलातील काही लोक विमानाने परतले, ज्यामुळे कार्बन उत्सर्जन झाले आणि ‘झिरो कार्बन’चा दावा कमकुवत झाला.

ग्रेटाचे भारतातील शेतकरी आंदोलनाला समर्थन

ग्रेटाने भारतातील कृषी कायद्यांविरोद्धात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना समर्थन दिले होते. त्यांनी ‘X’वर पोस्ट केले की, हे आंदोलन ‘दमनकारी धोरणां’विरुद्धची लढाई आहे. पण, हे आंदोलन बहुतेक त्या शेतकऱ्यांच्या मागण्यांशी संबंधित होते, जे धान शेती आणि तिच्या सबसिडीचे रक्षण करू इच्छित होते. हे काही राजकीय लॉबींशीही जोडले होते, जे धान्य बाजारांवर (APMC मंड्यांवर) कब्जा करतात.

प्रत्यक्षात भारतातील हे शेतकरी आंदोलन खलिस्तानी चळवळीचा एक भाग होते, तसेच देश अस्थिर करण्याचे षडयंत्र होते. या प्रकरणातही ग्रेटाने समस्येची खोली समजून न घेता देशविरोधी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची बाजू घेतली होती.

७ ऑक्टोबर रोजी हमासने शेकडो इस्त्रायली आणि परदेशी लोकांचे अपहरण केले होते, ज्यात लहान मुले, वृद्ध आणि महिलांचा समावेश होता. अनेक जण मारले गेले, अनेकांना निर्दयपणे छळण्यात आले आणि काही आजही त्यांच्या ताब्यात आहेत. त्यांच्याविषयी ग्रेटाने (Greta Thunberg) आजपर्यंत कधी सहानुभूती दर्शवलेली नाही. बांगलादेशात अनेक हिंदूंचा छळ करण्यात येत आहे. त्यांनाही साहाय्य करावे, असे ग्रेटा यांना कधी वाटले नाही. त्यामुळेच त्यांची ही स्टंटबाजी कट्टरतावाद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठीच आहे, हेच खरे !

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.