Green Chillies Price : हिरव्या मिरचीला दर नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त

70
Green Chillies Price : हिरव्या मिरचीला दर नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त
Green Chillies Price : हिरव्या मिरचीला दर नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त

मागील वर्षी मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मिरची उत्पादनातून चांगला भाव मिळाला होता. (Green Chillies Price) त्यामुळे यंदा नंदुरबार आणि शहादा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड वाढवली आहे; परंतु सध्या मिरचीचे पीक चांगले असले, तरी खर्चाच्या मानाने हिरवी मिरची बाजारात केवळ 12 ते 15 रुपये किलो विकली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना मिरचीचे उत्पादन परवडत नसून त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

(हेही वाचा – Nagpur Flood : पावसाचा कहर १४० जणांसह ४० मुकबधीर मुलांचीही सुटका)

भाव कमी झाल्याने उत्पादन खर्च पण निघाला नाही – भावेश पटेल, शेतकरी

यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांनी विहीर, तसेच कुंपण नलिकेचे पाणी भरून मिरचीचे पीक जगवले आहे. (Green Chillies Price) सुरुवातीला बाजारात 30 ते 35 रुपये किलोने विकली जाणाऱ्या हिरवी मिरचीचे भाव सध्या 12 ते 15 रुपयांवर आले आहेत. भाव कमी झाल्याने मिरची लागवडीपासून ते आता उत्पादन निघेपर्यंत मजुरीचा खर्च, फवारणी खर्चासह इतर खर्च निघेनासा झाला आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहे.

शेतकऱ्यांचे भांडवल निघणेसुद्धा मुश्किल – राकेश सोनार, मिरची उत्पादक शेतकरी

पुरेशा पावसाअभावी दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत असताना शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. मिरचीचे उत्पन्न निघेपर्यंत 1 किलो उत्पादन घेण्यासाठी साधारणता 20 ते 25 रुपये खर्च शेतकऱ्यांना येतो. दोनशे रुपये मजुरी याप्रमाणे 1 मजूर साधारण 25 किलो मिरची दिवसभरात तोडतो म्हणजे शेतकऱ्यांना 8 ते 9 रुपये किलोप्रमाणे मिरची तोडावी लागते, शिवाय मिरची बाजारात घेऊन जाताना वाहतुकीचा खर्च वेगळा असतो. परंतु सध्या बाजारात 12 ते 15 रुपये दराने मिरची विकली जात असल्याने शेतकऱ्यांचे भांडवल निघणेसुद्धा मुश्किल झाले आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. (Green Chillies Price)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.