‘गौरवशाली महाराष्ट्र दर्शन’चे मंत्रालयात भव्य उद्घाटन; एकाच छत्राखाली Maharashtra राज्याच्या ६५ वर्षांच्या इतिहासाचा प्रवास!

27
‘गौरवशाली महाराष्ट्र दर्शन’चे मंत्रालयात भव्य उद्घाटन; एकाच छत्राखाली Maharashtra राज्याच्या ६५ वर्षांच्या इतिहासाचा प्रवास!
  • प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या (Maharashtra) समृद्ध वारशाचे दर्शन घडवणाऱ्या ‘गौरवशाली महाराष्ट्र दर्शन’ या भव्य चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सोमवारी मंत्रालयात पार पडले.

१९ ते २१ मे दरम्यान मंत्रालयात हे चित्रप्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार असून, महाराष्ट्राच्या (Maharashtra)  ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रवासाचे दर्शन एकाच जागी घडणार आहे. प्रदर्शनाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले असून, महाराष्ट्राच्या गौरवशाली ६५ वर्षांच्या वाटचालीचा हा दस्ताऐवज असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

(हेही वाचा – “गोली उन्होने चलाई थी पर धमाका हमने किया”; Operation Sindoor बाबत भारतीय लष्कराच्या जवानाने दिली माहिती)

महापुरुषांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंतचा प्रवास

मंत्री आशिष शेलार म्हणाले, “महाराष्ट्राचा इतिहास महापुरुष, संत परंपरा, सामाजिक क्रांतीकारक आणि आधुनिक युगातील नेतृत्व यांच्यामुळे समृद्ध आहे. हा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सजवलेले हे प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra)  फिरावे, ही माझी अपेक्षा आहे.”

तटकरे यांचे अभ्यासपूर्वक सादरीकरण

खासदार सुनिल तटकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून इतिहासाचे अभ्यासपूर्ण व सखोल दर्शन घडवले आहे. त्यांच्या या प्रयत्नाचे आशिष शेलार यांनी विशेष कौतुक केले.

प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, तसेच आनंद परांजपे, संजय तटकरे, सिध्दार्थ कांबळे, सुरज चव्हाण, संजय बोरगे, लतिफ तांबोळी यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(हेही वाचा – IPL 2025, Shubman Gill : शुभमन गिलने दाखवून दिली कर्णधार म्हणून मनाची स्थिरता)

यशस्वी आयोजनाची प्रेरणा

या प्रदर्शनाची प्रेरणा १ ते ४ मे दरम्यान जांबोरी मैदानावर पार पडलेल्या “गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-२०२५” या कार्यक्रमातून घेतली गेली. त्या महोत्सवात महाराष्ट्राचे (Maharashtra)  विचारसूत्र, महाराष्ट्र धर्म, गर्जा महाराष्ट्र, महाराष्ट्र रत्न आणि मुख्यमंत्री दालन अशा पाच भव्य दालनांमध्ये राज्याच्या गौरवशाली परंपरेचे चित्रदर्शन साकारण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महोत्सवात सहभागी होताना मंत्रालयातही असेच प्रदर्शन आयोजित करण्याची सूचना केली होती, त्यानुसार हे आयोजन घडवून आले.

प्रदर्शनात काय पहायला मिळेल?

या चित्रप्रदर्शनात संत परंपरेचा संदेश, महापुरुषांचे कार्य, भारतरत्न लाभलेले दिग्गज, विविध मुख्यमंत्रींचे योगदान, तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास याची माहिती विस्तृत स्वरूपात मांडण्यात आली आहे. हा एकाच छत्राखाली महाराष्ट्राच्या (Maharashtra)  सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय वाटचालीचा समग्र आढावा घेण्याचा प्रयत्न असल्याचे खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितले.

(हेही वाचा – चुकीच्या पद्धतीने सशुल्क वाहनतळाच्या कंत्राटाला मुदतवाढ; Adv. Makarand Narvekar यांनी केली ‘ही’ मागणी)

समारोप महाडमध्ये भव्य सांस्कृतिक सोहळ्याने

“गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-२०२५” अंतर्गत खासदार तटकरे २२ मे रोजी कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी वंदन करणार आहेत. त्यानंतर २३ मे रोजी सकाळी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना आणि महाड येथील चवदार तळ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संध्याकाळी ६.३० वाजता महाडच्या कांदे मैदानावर महोत्सवाचा भव्य सांस्कृतिक समारोप पार पडणार आहे.

‘गौरवशाली महाराष्ट्र दर्शन’ हे प्रदर्शन केवळ एक दृश्य मेळावा नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा, संघर्षाचा आणि विकासाचा प्रेरणादायी दस्तऐवज आहे. प्रशासनातील अधिकारी, सर्वसामान्य नागरिक आणि विशेषतः युवा पिढीने या प्रदर्शनाला भेट देणे ही महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाला उजाळा देण्याची संधी ठरणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.