-
प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधून राज्यभरात मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर, नाशिक आणि पुणे येथे होणाऱ्या या कार्यक्रमांमधून अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव, संस्कृतीचा सन्मान आणि परंपरेचा अभिमान रसिकांसमोर उभा राहणार आहे.
या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने मंत्री ॲड. आशिष शेलार आणि विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
(हेही वाचा – मोबाईल बॅन! पण टेन्शन नाही; Polling Center बाहेर असणार आता ‘ही’ खास व्यवस्था)
नागपूर : २५ मे, कविवर्य सुरेश भट सभागृह
सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात अहिल्यादेवींच्या (Ahilyadevi Holkar) जीवनावर आधारित पोवाडे, संगीत, नाट्य व इतर कलाविष्कार सादर होणार असून, विदर्भातील रसिकांना याचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक आनंद घेता येणार आहे.
नाशिक : २७ व २८ मे – ‘गाथा अहिल्यादेवींची, आपल्या संस्कृतीची’
या दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवात अहिल्यादेवींच्या (Ahilyadevi Holkar) कार्यावर आधारित विविध नाट्यप्रयोग, गीत-संगीत आणि कलाप्रस्तुती करण्यात येणार आहे. २८ मे रोजी ‘राजयोगिनी अहिल्यादेवी’ हे ऐतिहासिक नाटक देखील सादर केले जाईल. दोन्ही दिवसांचे कार्यक्रम सायंकाळी ६.३० वाजता सुरू होतील.
(हेही वाचा – नाल्यातील काढलेला गाळ दोन दिवसांत हटवा; DCM Eknath Shinde यांनी सफाईच्या कामाला दिली ७ जूनची डेडलाईन)
पुणे : ३१ मे – बालगंधर्व रंगमंदिर
शाहिरी पोवाडा, मर्दानी खेळ, भारूड, वासुदेव यांसारख्या पारंपरिक लोककला प्रकारांबरोबरच ‘पुण्यश्र्लोक’ या भव्य महानाट्याची रंगतदार सादरीकरण होणार आहे. सायंकाळी ६ वाजता सुरू होणारा हा सोहळा पुणेकर रसिकांसाठी सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे.
सर्व कार्यक्रम विनामूल्य – नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
या तीनही ठिकाणचे कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून, अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याचा अनुभव घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community