Chandrakant Patil : हातमाग विणकरांना दरमहा पेन्शन देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार

वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, देशात येवल्याच्या पैठणीचा नावलौकिक आहे. याचबरोबर शाल, पैठणी, घोंगडी या पारंपारिक व्यवसायात विणकर हे वर्षभर काम करतात. परंतु त्यांना पाहिजे तसा मोबादला मिळत नाही. त्यामुळे उत्सव योजनेच्या माध्यमातून विणकरांचा व्यवसाय टिकण्यास मदत होईल व कुटूंबाला उदरनिर्वाह होण्यास मदत होईल.

149
Chandrakant Patil : पीएम-उषा योजनेअंतर्गत महाराष्ट्राला ७९१.१७ कोटी रुपये मंजूर

हातमाग विणकरांच्या व्यवसायाला चालना व या उद्योगाला उभारी देण्यासाठी हातमाग विणकरांना उत्सव योजनेचा लाभ वर्षातून किमान दोन ते तीन वेळेस देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर विणकरांना वयाच्या ६० वर्षानंतर दरमहा पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा शासनस्तरावर विचार सुरू असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. (Chandrakant Patil)

येवला येथील महात्मा फुले नाट्यगृहामध्ये एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ अंतर्गत हातमाग विणकरांना उत्सव भत्ता धनादेश वाटप सोहळा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी आमदार किशोर दराडे, वस्त्रोद्योग विभागाच्या उपसचिव श्रद्धा कोचरेकर, प्रादेशिक उपायुक्त दिपक खांडेकर, वस्त्रनिर्माण निरीक्षक गजानान पात्रे, तांत्रिक सहाय्यक एस. बी. बर्मा यांच्यासह यंत्रमाग संघटनेचे पदाधिकारी, कामगार व नागरिक उपस्थित होते. (Chandrakant Patil)

(हेही वाचा – Modi Govt च्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेची विक्रमी घोडदौड; विश्वास पाठक यांचे प्रतिपादन)

विणकरांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा – चंद्रकांत पाटील

वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, देशात येवल्याच्या पैठणीचा (Yevla Paithani) नावलौकिक आहे. याचबरोबर शाल, पैठणी, घोंगडी या पारंपारिक व्यवसायात विणकर हे वर्षभर काम करतात. परंतु त्यांना पाहिजे तसा मोबादला मिळत नाही. त्यामुळे उत्सव योजनेच्या माध्यमातून विणकरांचा व्यवसाय टिकण्यास मदत होईल व कुटूंबाला उदरनिर्वाह होण्यास मदत होईल. त्याअनुषंगाने विणकरांना वर्षातून किमान दोन ते तीन वेळेस लाभ देण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. (Chandrakant Patil)

वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  पुढे म्हणाले, नोंदणीकृत व प्रमाणित हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या उत्कृष्ट वाणाला सन्मान मिळण्यासाठी शासनाने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ अंतर्गत विविध योजना जाहीर केल्या आहेत. या धोरणाच्या माध्यमातून विणकरांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांनी यावेळी केले. (Chandrakant Patil)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.