लॉकडाऊन नंतर अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या, काही लोक नव्या नोकरीच्या शोधात आहेत. जे विद्यार्थी, सरकारी हक्काची नोकरी मिळावी याकरता दिवसरात्र प्रयत्न करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३ हजार ६०३ जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. २२ मार्च २०२२ पासून आयोगाच्या अधिकृत वेबसाइट https://ssc.nic.in वर जाऊन इच्छुक विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरू शकतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२२ आहे.
( हेही वाचा : आनंदाची बातमी! यंदा पगार आणि नोक-याही वाढणार )
नियम व अटी
- पदाचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस)
- पद संख्या – ३ हजार ६०३ जागा (महाराष्ट्रात जवळपास पाचशे जागा)
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – २२ मार्च २०२२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० एप्रिल २०२२
- अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in
- शैक्षणिक पात्रता – 1 जानेवारी 2022 रोजीपर्यंत, प्रत्येक उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून १० वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- वयोमर्यादा – उमेदवारांसाठी किमान वय १८ आहे, तर कमाल वयोमर्यादा २५ असेल.
- प्रथम संगणक आधारित परीक्षा (पेपर -1) होईल ज्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न असून Negative marking असेल.
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा केले जातील.